अपहरण केलेल्या बालिकेची सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपहरण केलेल्या बालिकेची सुटका
अपहरण केलेल्या बालिकेची सुटका

अपहरण केलेल्या बालिकेची सुटका

sakal_logo
By

पिंपरी/जुन्नर, ता. २४ : चिखली येथून साडे तीन वर्षीय बालिकेचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी दाम्पत्यासह सहा जणांना जेरबंद केले. संतोष मनोहर चौगुले (वय ४१), विमल संतोष चौगुले (वय २८, दोघेही रा. महादेवनगर, ता. जुन्नर), विमलची बहीण सुनीता नलावडे, निकीता नलावडे (रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांना अटक केली आहे. तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. चिखलीतील ताम्हाणेवस्ती येथून ही बालिका शनिवारी (ता. २३) दुपारी पावणेतीनच्या सुमारास बेपत्ता झाली होती.
मुलगी कुठेही दिसत नसल्याने तिच्या आईने तात्काळ चिखली पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास केला असता आरोपी विमल व तिचा मुलगा बालिकेला घेऊन जात चालल्याचे दिसले. त्यानुसार पोलिसांनी चौगुले दाम्पत्याचे मोबाईल लोकेशन तपासले असता ते जुन्नरला असल्याचे समजले. त्यानुसार, हा प्रकार जुन्नर पोलिसांना कळविला. त्यानंतर दोन्ही पोलिसांच्या तत्परतेमुळे बालिकेची सुखरूप सुटका झाली. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Pim22b10202 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..