तीन वर्षांपासून सुरूच दुरुस्ती, सुशोभीकरण

तीन वर्षांपासून सुरूच दुरुस्ती, सुशोभीकरण

एंट्रो
शहरात महापालिकेचे १३ तरण तलाव आहेत. मात्र त्यापैकी तब्बल सात बंद आहेत. यासाठीची विविध कारणे प्रशासनाकडून दिली जातात. यातील प्रमुख कारणे म्हणजे गळती, इतर दुरुस्ती, रंगरंगोटी..! मात्र, त्यासाठी काल व वेळ मर्यादा निश्चित केली नसल्याने तलाव वर्ष-दोन वर्षे बंद राहिले आहेत...याबाबत आजपासून
---
रमेश मोरे सकाळ वृत्तसेवा
जुनी सांगवी ः येथील ‘बाळासाहेब शितोळे जलतरण तलाव’ सलग तीन वर्षांपासून बंद आहे. आधी लॉकडाऊन होता, नंतर दुरुस्ती व सुशोभीकरणाची कामे सुरू केली आहेत. यामुळे उन्हाळ्यात पोहण्यासाठी सांगवी व परिसरातील नागरिकांना पिंपळे गुरव, बोपोडी, कासारवाडी या ठिकाणी जावे लागत आहे.

उन्हाळ्याच्या झळा सुरू आहेत. तसेच शाळा, महाविद्यालयांना दोन महिने सुटीचे असल्याने पोहायला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. सकाळपासून तलावावर गर्दी असते. याच काळात पोहायला शिकायला जाणाऱ्यांची संख्या असते. त्यामुळे मोठे उत्पन्न मिळणारा हा तलाव आहे. मात्र, आता तो बंद असल्याने सर्वांचा हिरमोड झाला आहे. साहजिकच पिंपळे गुरव येथील ‘काळुराम जगताप जलतरण तलावा’कडे लोक जात आहेत. तिकडे सर्व बॅच भरलेल्या असतात. याबाबत स्थापत्य विभागाचे अभियंता अब्दुल मोमीन म्हणाले, ‘‘काम गतीने सुरू आहे. येत्या चार ते पाच महिन्यांत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.’’
--
- सुरू असलेली कामे
गळती दुरुस्ती पूर्ण. आता जुन्या फरशा बदलून नविन फरशा टाकणे
तलाव परिसरात कुस्ती मैदान, जॉगिंग ट्रॅक
महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र
परिसराचे सुशोभीकरण. सुरक्षा भिंत, प्रवेशद्वार
कपडे बदलण्याची अद्ययावत खोली
फॅब्रिक छत, अंतर्गत व बाह्य बाजूची रंगरंगोटी
लहान मुलांसाठी तलावाची खोली कमी करणे
सुमार साडेचार कोटी रुपये खर्चाची ही कामे आहेत.

कोट
दोन वर्षापासून संथगतीने काम सुरू आहे. ते गतीने केले असते, तर किमान या हंगामात तरी नागरिकांचा हिरमोड झाला नसता. काम वेळेत व दर्जेदार व्हावे ही अपेक्षा आहे.
- प्रशांत शितोळे, माजी नगरसेवक

कोट
लहान मुलांना पोहायला शिकविण्यासाठी इतरत्र ठिकाणी जावे लागते. त्यामुळे वेळ व गर्दी याचा त्रास सहन करावा लागत आहे.
- रंजना मोरे, अध्यक्षा, मातृभूमी बचतगट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com