
राजनची १५ लाख रुपयांना विक्री
पिंपळवंडी, ता.९ : वैशाखखेडे (ता.जुन्नर) येथील शेतकरी कार्तिक गणपत शेटे यांच्या १८ महिन्यांच्या राजन या बैलाची १५ लाख २१ रुपयाला विक्री झाली. खेड तालुक्यातील तुषार डावरे यांनी या बैलाची खरेदी केली.
पिंपळवंडी विघ्नहर्ता बैलगाडा संघटनेचे कार्तिक शेटे यांनी सांगितले, की शर्यतीवर बंदी असताना आम्ही या बैलाला विकत घेतले. हा बैल मुळचा बंगलोरचा असून, आम्ही कराडच्या व्यापाऱ्यांकडून सदतीस हजार रुपयांना घेतला होता. त्यानंतर आम्ही त्याचे नाव राजन ठेवले. त्याला आमच्या पद्धतीने चुणी, गहू, भुसा हा खुराक दिला. त्याची चांगल्या प्रकारे तब्येत करून त्याला घाटात सराव करण्यासाठी नेत होतो.
पहिल्यांदा राजनला गिरवली या ठिकाणी घाटात जुंपला असता त्याचा दुसरा क्रमांक आला. यानंतर आम्ही त्याच्या तब्येतीकडे अधिक लक्ष दिले. आजपर्यंत राजनने त्याने दहा घाट पार केले केले आहेत. त्याने सात घाटांमध्ये प्रथम क्रमांक पटकविला आहे. तसेच खापरवाडी या ठिकाणी फळीफोडचा मानकरी देखील ठरला.
पिंपळवंडी विघ्नहर्ता बैलगाडा संघटनेचे किशोर शेटे, अक्षय शेटे, ओंकार शेटे, किरण शेटे, अभि वाघमारे, मेघराज टाकळकर, ओंकार गवांदे, संकेत टाकळकर, विशाल वाघ, स्वप्नील कोकाटे, गौरव कोकाटे, अमीर माळी, संकेत शिंदे, राहुल गायकवाड, अतुल गायकवाड यांनी या बैलाच्या संगोपनासाठी मेहनत घेतली.
01300
Web Title: Todays Latest District Marathi News Pln22b00789 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..