घराजवळ येऊन बसतोय बिबट्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घराजवळ येऊन बसतोय बिबट्या
घराजवळ येऊन बसतोय बिबट्या

घराजवळ येऊन बसतोय बिबट्या

sakal_logo
By

पिंपळवंडी, ता.२० : येथील (ता.जुन्नर) गावठाण परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांना होऊ लागले आहे. रात्री आठच्या सुमारास बिबट्या घराच्या बाजूला वीस ते तीस फूट अंतरावर दररोज येऊन बसत असल्याचे मयूर निमसे यांनी सांगितले. सभोवताली बिबट्याच्या वावरामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी बिबट्याने परिसरातील शेतकऱ्यांचे पाळीव प्राणी तसेच मोकाट कुत्र्यांना लक्ष केलेले आहे. भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वनविभागाने येथे येऊन पाहणी करून पिंजरा लावावा, तसेच नागरिकांमध्ये मानव-बिबट सहजीवन याबाबत मार्गदर्शन करावे असे येथील रहिवाशांचे मत आहे.
बिबट्या मानवाच्या सोबतीला राहायला शिकला असताना येथील नागरिकांच्या पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ही नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना वनविभागाच्या कार्यालयात अनेकदा फेऱ्या माराव्या लागत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Pln22b00809 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..