पिंपरी पेंढारमध्ये महिलांना मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी पेंढारमध्ये महिलांना मार्गदर्शन
पिंपरी पेंढारमध्ये महिलांना मार्गदर्शन

पिंपरी पेंढारमध्ये महिलांना मार्गदर्शन

sakal_logo
By

पिंपळवंडी,ता.३०: पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग जुन्नर यांच्या वतीने नुकतीच महिला कृषी शाळेचे आयोजन केले होते. यावेळी राष्ट्रीय अन्न सुरक्षा, पौष्टिक तृण धान्य, रब्बी ज्वारी प्रकल्पाअंतर्गत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

शेतीशाळेमध्ये महिला शेतकऱ्यांना कृषी अधिकरी सतिष शिरसाठ यांनी महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय योजनांची सखोल माहिती दिली तसेच रब्बी ज्वारी पिकाचे कमी उत्पादनात जास्तीत जास्त उत्पादन करे करावे याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी तालुका कृषी अधीकारी सतीष शीरसाठ, मंडळ कृषी अधिकारी हरीश माकर, कृषी पर्यवेक्षक बाळशीराम जाधव यांनी ही मार्गदर्शन केले.

यावेळी शेतीशाळेसाठी सरपंच सुरेखा वेठेकर, उपसरपंच अमोल वंडेकर, सदस्या सविता पोटे, निवृत्त कृषी पर्यवेक्षक किसन शेलार, प्रगतशील शेतकरी सुभाष काळे, मुरलीधर दुरगुडे, शेतकरी गटातील महीला शेतकीरी हौसाबाई पोटे, नंदा पोटे, कांचन पोटे, मनीषा पोटे, रेखा पोटे, बबाबाईपोटे आदी महिला शेतकरी उपस्थित होत्या.

01412