पिंपळवंडीत १ मेंढी, २ कोकरू ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपळवंडीत १ मेंढी, २ कोकरू ठार
पिंपळवंडीत १ मेंढी, २ कोकरू ठार

पिंपळवंडीत १ मेंढी, २ कोकरू ठार

sakal_logo
By

पिंपळवंडी, ता. २४ : पिंपळवंडी-वामनपट्टा (ता. जुन्नर) येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात १ मेंढी व २ कोकरू ठार झाले. वामनपट्टा शिवारातील शेतकरी नवनाथ वामन यांच्या शेतात शनिवारी लालू आनंदा करमळ यांचा मेंढ्यांचा कळप थांबलेला असताना रविवारी (ता. २४) पहाटे चारच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून १ मेंढी व २ कोकरू ठार केले. या घटनेची माहिती तान्हाजी वामन यांनी वनविभागाला कळवली. वनविभागाचे संतोष साळुंखे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पिंपळवंडी परिसरात दररोज बिबट्याचे दर्शन नागरिकांना होत आहे. शेतकऱ्यांच्या पशुधनाचे नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार देखील जखमी झालेले आहेत.