माळशेज घाट परिसरात
नाशिकच्या ट्रेकरचा मृत्यू

माळशेज घाट परिसरात नाशिकच्या ट्रेकरचा मृत्यू

पिंपळवंडी, ता. १९ : माळशेज घाट परिसरात चोरदरा घाट चढत असताना नाशिक येथील ट्रेकरचा ५० फूट कोसळून मृत्यू झाला. किरण काळे (वय ५२), असे त्यांचे नाव आहे.
नाशिक येथील ‘जिप्सी ट्रेकर्स’च्या १५ ट्रेकरचा ग्रुप माळशेज परिसरात रविवारी (ता. १९) जुना माळशेज घाट व चोरदरा घाट ट्रेक करण्यासाठी आला होता. दुपारच्या सुमारास चोरदरा घाट चढत असताना शेवटच्या चढाईदरम्यान लागणाऱ्या कठीण टप्प्यावरून जवळपास पन्नास फूट खाली पडून किरण काळे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच गिर्यारोहक व रेस्क्यू समन्वयक ओंकार ओक यांनी तातडीने नाशिक क्लाइम्बर्स व रेस्क्यू असोसिएशनचे दयानंद कोळी यांच्याशी तसेच जुन्नर येथील शिवनेरी ट्रेकर्सशी संपर्क साधून घटनेची माहिती कळवली.
शिवनेरी ट्रेकर्सचे सदस्य नीलेश खोकराळे, अनिल काशीद, अक्षय तांबे, संतोष डुकरे, निखिल कोकाटे, अल्पेश दिघे, अनिकेत डुकरे यांनी घटनास्थळी जाऊन इतर ट्रेकरना सुखरूप बाहेर काढले. त्यांना कमळू पोकळा, अशोक पोकळा, भास्कर रवी, रोहिदास कोरडे व इतर ग्रामस्थांनी सहकार्य केले.
नाशिकचे दयानंद कोळी, मुरबाड येथील सह्यगिरी ट्रेकर्सचे दीपक विशे व खोपोली येथील गणेश गिध हे खोल दरीत पडलेला किरण काळे यांचा मृतदेह बाहेर काढण्याचे काम करत आहेत. यावेळी मुरबाड पोलिस स्टेशनचे पोलिस उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com