‘भैरवनाथ ग्राम विकास’ची सिंगापूर ग्रामपंचायतीत बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘भैरवनाथ ग्राम विकास’ची 
सिंगापूर ग्रामपंचायतीत बाजी
‘भैरवनाथ ग्राम विकास’ची सिंगापूर ग्रामपंचायतीत बाजी

‘भैरवनाथ ग्राम विकास’ची सिंगापूर ग्रामपंचायतीत बाजी

sakal_logo
By

पारगाव मेमाणे, ता. ५ः सिंगापूर (ता. पुरंदर) येथील पंचवार्षिक ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामदैवत भैरवनाथ ग्राम विकास पॅनेलने सात पैकी पाच जागा जिंकून बाजी मारली आहे. स्व. शंकरराव उरसळ (अण्णा) ग्राम विकास पॅनेलला दोन जागांवर समाधान मानावे लागले. या ग्रामपंचायत निवडणुकीत कमालीची चुरस पाहायला मिळाली. सात सदस्य संख्या असलेल्या सिंगापूर ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपद ''सर्वसाधारण''साठी आहे.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे- विक्रांत सुरेश पवार, सौरभ दिलीप लवांडे, अर्चना लवांडे, विशाल शांताराम लवांडे, संगीता हनुमंत वारे, चांगुणाबाई वाघमारे आणि मीना उरसळ.
आज (ता. ५) पुरंदर तहसील कार्यालयात तहसीलदार रूपाली सरनोबत यांच्या उपस्थितीत सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला. पी. बी. कोरे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व सतीश उमाप यांनी सहाय्यक अधिकारी म्हणून काम केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Pmm22b00193 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..