धोकादायक झाडे झुडपे काढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धोकादायक झाडे झुडपे काढा
धोकादायक झाडे झुडपे काढा

धोकादायक झाडे झुडपे काढा

sakal_logo
By

पारगाव मेमाणे, ता.२८ : एखतपूर मुंजवडी (ता. पुरंदर) येथे सासवड सुपा रस्त्याला येऊन मिळणारा व झेंडेवाडी, दिवेघाटमार्गे पुण्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगतची झाडे
जीवघेणे ठरत आहेत. येथे वारंवार लहानमोठे अपघात होत आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने ती तातडीने काढावीत, अशी स्थानिक तसेच प्रवाशांकडून होत आहे.

जेजुरीकडून येणारी वाहने सासवडकडून येणाऱ्या प्रवाशांना झाडांमुळे दिसत नाहीत व समोरासमोर धडकून अपघात होत आहेत. तातडीने ही झाडे काढावीत यासाठी प्रवासी व नागरिक आग्रही आहेत. याठिकाणी वारंवार अनेक दुर्घटना होत आहेत. गांभीर्य ओळखून बांधकाम विभागाने कार्यवाही करावी, अशी खानवडी, पारगाव, पिसर्वे, भोसलेवाडी इत्यादी गावाकडे
जाणाऱ्या विद्यार्थी व प्रवाशांची मागणी आहे.

पुण्यात जाण्यासाठी सासवडला वळसा घालण्यापेक्षा झेंडेवाडी रस्त्याने जाण्यास प्रवासी पसंती देतात. त्यामुळे हा रस्ता रहदारीचा आहे. एखतपूर फाट्यावर वाढलेल्या झाडांमुळेच वेळोवेळी जीवघेणे अपघात होत आहेत.
-पोपट शांताराम मेमाणे, प्रवासी, पारगाव मेमाणे

वाहतुकीची कोंडी, संभाव्य अपघात टाळण्यासाठी येथे भाजी विक्रेत्यांना बसण्यास यापूर्वीच बंदी घातली आहे. येथूनच जवळच्या शाळांना जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जिवास धोका आहे. दरवर्षी येथील वाढणारी झाडे अपघातास कारण ठरत असल्याने कायमस्वरूपी त्यांचा बंदोबस्त होणे गरजेचे आहे.
- राजेंद्र निंबाळकर, स्थानिक शेतकरी, एखतपूर.


00401

Web Title: Todays Latest District Marathi News Pmm22b00198 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..