पारगाव मेमाणे येथे चोरट्यांचा धुमाकूळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पारगाव मेमाणे येथे 
चोरट्यांचा धुमाकूळ
पारगाव मेमाणे येथे चोरट्यांचा धुमाकूळ

पारगाव मेमाणे येथे चोरट्यांचा धुमाकूळ

sakal_logo
By

पारगाव मेमाणे, ता. २९ : पारगाव मेमाणे (ता. पुरंदर) येथे चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, एका रात्रीत विविध ठिकाणी घरफोडी करत रोख रक्कम व लाखोंचा ऐवज चोरला.
पारगाव मेमाणे येथील ग्रामस्थ मागील आठवडाभर बिबट्यांच्या अस्तित्वाने प्रचंड दडपणाखाली असताना आता चोरट्यांनी घातलेल्या धुमाकुळामुळे प्रचंड दहशतीखाली आहेत. येथील माळवाडी येथील दशरथ मेमाणे यांच्या घरातील सात तोळे सोन्याचे दागिने व ३५ हजार रुपयाची रक्कम; तर कैलास मेमाणे यांच्या घरातील धार्मिक कार्यासाठी जमा केलेले सुमारे एक लाख रुपये चोरट्यांनी यावेळी पळविले. पांढर वस्तीवरील विजय दत्तात्रेय गायकवाड यांच्या कुटुंबातील सदस्य पहाटे गाढ झोपले असताना साडेतीन तोळे सोन्याचे दागिने व सुमारे पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी पळविली. तसेच, गावठाणमधील काही दारांचे कोयंडे मोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती पोलिस पाटील सारिका शांताराम सावंत यांनी दिली.
जेजुरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक पुंडलिक गावडे; तसेच राहुल माने, झेंडे, बनसोडे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळांची पाहणी करून पंचनामा केला.

रात्रीच्या वेळी ग्रामस्थांनी अंगणात झोपू नये. बंद घरामध्ये सावध झोपावे. ग्राम सुरक्षा दूरध्वनी यंत्रणा तातडीने सुरू करणे गरजेचे आहे.
- सारिका सावंत, पोलिस पाटील, पारगाव मेमाणे (ता. पुरंदर)