लालपरीतील बिघडामुळे प्रवाशांचे हाल एसटी बंद पडल्यामुळे प्रवाशांचे हाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लालपरीतील बिघडामुळे प्रवाशांचे हाल
एसटी बंद पडल्यामुळे प्रवाशांचे हाल
लालपरीतील बिघडामुळे प्रवाशांचे हाल एसटी बंद पडल्यामुळे प्रवाशांचे हाल

लालपरीतील बिघडामुळे प्रवाशांचे हाल एसटी बंद पडल्यामुळे प्रवाशांचे हाल

sakal_logo
By

भोर, ता. ३० : राज्य परिवहन महामंडळाच्या भोर आगारातील सर्व चालक, वाहक आणि कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. पण काही गेल्या सहा महिन्यांपासून बंद असल्यामुळे बस नादुरुस्त आहेत. यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांचे हाल वाढले आहेत. रस्त्यात एसटी बंद पडली की दुसरी एसटी येईपर्यंत किंवा दुसरे वाहन मिळेपर्यंत प्रवाशांना ताटकळत बसावे लागते.

दरम्यान, प्रवाशांना बसण्यासाठीच्या बाकांची आणि स्वच्छतागृहाची साफसफाई सुरू आगारातर्फे सुरू आहे. एसटीमधील सीट, खिडक्या व इतर साहित्यांची दुरुस्ती युध्दपातळीवर सुरु आहे. सध्या यात्रेचा सीझन सुरू असल्यामुळे ग्रामीण भागात जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. नादुरुस्त झालेल्या गाड्यांची दुरुस्ती मोठ्या प्रमाणात करण्यास सुरुवात केली आहे, असे आगार व्यवस्थापक युवराज कदम यांनी सांगितले.

१. १० हजार किलोमीटर...... दररोजचे अंतरावर एटीच्या फेऱ्या
२. २ लाख रुपये....आगाराचा दररोजचा तोटा

ग्रामीण भागात उत्पन्नात घट
तोट्यात असलेल्या भोर आगाराच्या तोट्यात अधिकच भर पडत आहे. आगाराकडून तालुक्याच्या सर्वच ग्रामीण भागात एसटी पुन्हा सुरू झाली आहे. भोर आगारातील सोलापूर, नाशिक, औरंगाबाद, बोरिवली, परेल व पुणे या मार्गावरील एसटीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात आहे. परंतु ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या तोट्यात आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील अनेक प्रवाशांनी खासगी वाहनाची सोय केलेली आहे. त्यामुळे आणि एसटीच्या गाड्यांची परिस्थिती एवढी चांगली नसल्यामुळे ग्रामीण भागात एसटीच्या उत्पन्नात घट होत आहे.

आगारात या आहेत समस्या...
१. आगारात एसटी स्थानकातील आणि गाड्यांमधील सोयीसुविधा पुरविण्यात आलेल्या नाहीत.
२. एसटी स्थानकाच्या आवारातील खड्डे अद्यापही तसेच आहेत
३. रात्रीच्या वेळी विजेची योग्य ती सोय नाही
४. एसटी वेळेवर नसल्यामुळे प्रवाशांना स्थानकच प्रतीक्षा करावी लागते.

भोर आगारातील सर्व २३१ कर्मचारी संपानंतर पुन्हा कामावर हजर झाले आहेत. पाच-सहा महिन्यांपासून गाड्या एकाच जागेवर उभ्या असल्यामुळे त्या गाड्या मार्गावर गेल्यानंतरच त्यामधील त्रुटी व अडचणी लक्षात येतात. पुढील दोन-तीन दिवसांत आगारातील सर्व गाड्या सुस्थितीत येऊन सर्व ठिकाणच्या फेऱ्या नियमितपणे सुरू होतील. प्रवाशांच्या विनंतीनुसार कुठल्याही ठिकाणी गाडी थांबून प्रवाशांना प्रवासाची सेवा दिली जाईल.
- युवराज कदम, आगार व्यवस्थापक, भोर


59935

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c57153 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top