
माती, राखेची वाहतूक करणाऱ्यांमुळे अपघात
भोर, ता. २७ : तालुक्यातील वीटभट्टीचालकांसाठी मातीची आणि राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. मातीची व राखेची वाहतूक करणारे १० ते १२ चाकांचे मोठमोठे डंपर रस्त्यांवरून सुसाट जात आहेत. ते इतर वाहनांना पुढे जाण्यासाठी रस्ता देत नाहीत. छोट्या रस्त्यांवरून डंपर गेल्यामुळे रस्तेही लवकरच खराब होत आहेत. माती किंवा राख भरल्यानंतर त्यावर ताडपत्रीचे झाकण लावून व्यवस्थितपणे वाहतूक करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, माती किंवा राखेचा डंपर वीटभट्टीवर खाली केल्यानंतर गाडीत शिल्लक राहिलेल्या माती व राखेपासून होणाऱ्या त्रासाकडे वाहनचालक आणि वीटभट्टीचालक पूर्णपणे दुर्लक्ष करतात. रिकाम्या गाडीत काही प्रमाणात राख आणि माती शिल्लक राहते. गतिरोधकावर गाडी आपटल्याने माती किंवा राख पाठीमागून येणाऱ्या वाहनांवर पडते. दुचाकीस्वार व पादचाऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होते.
अशी वाहतूक करणारी वाहने सुसाट निघून जातात. त्यामुळे पोलिस ठाण्यात किंवा तहसीलदार कार्यालयात रीतसर तक्रार देण्यास अडचणी येत आहेत. परंतु, महसूल आणि पोलिस प्रशासन संबंधित परवानाधारक वाहनचालकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने काळजी घेण्याची सक्ती करावी अशी मागणी केली जात आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c57635 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..