
वाल्ह्याच्या उपसरपंचपदी अंजली कुमठेकर
वाल्हे, ता. २७ : वाल्हे (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अंजली दीपक कुमठेकर यांची बिनविरोध निवड झाली.
उपसरपंच चंद्रशेखर दुर्गाडे यांनी राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त झाली होती. रिक्त
पदासाठी निवडणूक सरपंच अमोल खवले यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामपंचायत कार्यालयात घेण्यात आली. यावेळी अंजली कुमठेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी बबनराव चखाले यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.
या प्रसंगी सुनीता ढोबळे, दीपाली भोसले, सुरेखा भुजबळ, सत्यवान सूर्यवंशी, सुनील पवार, त्रिंबक भुजबळ, सूर्यकांत भुजबळ, हनुमंत पवार, संभाजी पवार आदि उपस्थित होते.
यावेळी समदास भुजबळ, अमोल भुजबळ, किरण कुमठेकर, अनिल भुजबळ, सुनीता भुजबळ आदींनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान, निवडीनंतर माजी सरपंच दत्तात्रेय पवार यांच्या हस्ते नवनिर्वाचित उपसरपंच अंजली कुमठेकर यांचा सत्कार करण्यात आला. पोपटनाना पवार, नारायण पवार, डॉ. रोहिदास पवार उपस्थित होते.
सरपंच अमोल खवले यांनी प्रास्ताविक केले. दीपक कुमठेकर यांनी आभार मानले.
60243
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c57680 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..