
घोडेगावात हल्ला प्रकरणी एक अटक
घोडेगाव, ता. २८ : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब उर्फ नंदकुमार बोऱ्हाडे यांच्यावर १० मार्च रोजी बसस्थानक परिसरामध्ये रात्रीच्या वेळी धारदार शस्त्राने हल्ला झाला. या प्रकरणी जितेंद्र प्रभाकर काळे (वय - ४० रा. काळेवाडी- दरेकरवाडी) यास अटक केली असून दोघांना ताब्यात घेतले आहे. तब्बल ४८ दिवसांनी या गुन्ह्याचा तपास लागला. घोडेगाव पोलिसांनी गोपनीय बातमीदारामार्फत अटक केल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांनी दिली.
नंदकुमार बोऱ्हाडे यांच्यावर मोटार सायकलवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. त्यामध्ये बोऱ्हाडे यांच्या पोटाला किरकोळ दुखापत झाली. तर हाताला गंभीर दुखापत होऊन डाव्या हाताचे एक बोट तुटले आहे.
या गुन्ह्यातील हल्लेखोरांना लवकर अटक करण्याची मागणी विविध संघटनांनी मूक मोर्चा काढत केली होती. त्याबाबतचे निवेदनही पोलिसांना दिले होते.
या तपासात खबरीने दिलेल्या माहितीनुसार जितेंद्र काळे, योगेश पवार (रा. विक्रोळी, मुंबई), जाफर शमीम अहमद याने हल्ल्याचा कट रचून हल्ला घडवून आणला. याप्रकरणी जितेंद्र काळे यास ७ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c58224 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..