
डॉ. मणिभाई देसाईंनी ग्रामीण विकासाची पायाभरणी केली : अगरवाल
उरुळी कांचन, ता. ३० : डॉ. मणिभाई देसाई यांनी बायफ, निसर्गोपचार आश्रम, महात्मा गांधी सर्वोदय संघ, यशवंत सहकारी साखर कारखाना आदी संस्थांची स्थापना करून ग्रामीण विकासाची पायाभरणी केली. त्यांनी स्थापन केलेल्या संस्थांमधून लोकोपयोगी कामे आजही सुरु आहेत. डॉ. मणिभाई देसाई पतसंस्थेने जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविल्यामुळे त्यांच्या कार्याची माहिती तरुण पिढीला होत असल्याचे प्रतिपादन विश्वराज हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विक्रम अगरवाल यांनी केले.
उरुळी कांचन येथे डॉ. मणिभाई देसाई पतसंस्था मर्यादित, उरुळी कांचन तसेच विश्वराज हॉस्पिटल, लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. मणिभाई देसाई यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी अगरवाल बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनचे अध्यक्ष भरत काकडे यांच्या हस्ते झाले. या वेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये १५४ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. तर ३५० नागरिकांची मधुमेह, ५० जणांची ईसीजी, १०७ नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. तर १५० जणांची दंत तपासणी केली.
यावेळी माजी सरपंच ज्ञानोबा तुळशीराम कांचन, निसर्गोपचार आश्रम मुख्य विश्वस्त एन. जी. हेगडे, जिल्हा परिषद सदस्या कीर्ती कांचन, पंचायत समिती सदस्य हेमलता बडेकर, सरपंच राजेंद्र कांचन, विश्वराज हॉस्पिटल जनरल मॅनेजर डॉ. पी. के. देशमुख, आरोग्य अधिकारी डॉ. सुचेता कदम, संचालक शरद बनारसे, ग्रामपंचायत सदस्य सुनील तांबे, अमित कांचन आदी मान्यवर उपस्थित होते.
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c58708 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..