लंघेवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी संदीप लंघे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लंघेवाडी सोसायटीच्या 
अध्यक्षपदी संदीप लंघे
लंघेवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी संदीप लंघे

लंघेवाडी सोसायटीच्या अध्यक्षपदी संदीप लंघे

sakal_logo
By

गुनाट, ता. ३ ः लंघेवाडी (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी संदीप लंघे यांची तर उपाध्यक्षपदी सुशीला जासूद यांची निवड एकमताने निवड करण्यात आली. महिनाभरापूर्वी आदर्श सरपंच संतोष लंघे, पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र जासूद, अशोक चव्हाण, शहाजी जासूद, महिंद्र जासूद आदींच्या पुढाकारामुळे व ग्रामस्थ आणि मतदारांच्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पडली होती. निवडणूक निर्णय अधिकारी पी. बी. मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोसायटीच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत संचालकांच्या एकमताने वरील निवडी बिनविरोध करण्यात आल्या.
नूतन पदाधिकाऱ्यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांसाठी आवश्यक असणारी कर्ज पुरवठा व्यवस्था जास्तीत जास्त सुलभ कशी करता येईल, यासाठी आपण प्रामुख्याने काम करणार असल्याची माहिती नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप लंघे यांनी दिली.
61171

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c58924 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top