निमोणेच्या सरपंचपदी संजय काळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निमोणेच्या सरपंचपदी संजय काळे
निमोणेच्या सरपंचपदी संजय काळे

निमोणेच्या सरपंचपदी संजय काळे

sakal_logo
By

गुनाट, ता. ३० : निमोणे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी संजय ज्ञानदेव काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते सरपंच श्याम काळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ ढाके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत सरपंचपदासाठी संजय काळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष रवी काळे, माजी सरपंच श्याम काळे, उपसरपंच सारिका जाधव, ग्रामसेवक लहू जगदाळे, तलाठी विजय बेंडभर, शालन काळे, विजय पोटे, शांतिलाल होळकर, नानासाहेब काळे, बबन अनोसे, शांतिलाल काळे, ज्ञानदेव काळे, राजहंस काळे आदी उपस्थित होते. निमोणे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच संजय काळे यांनी निवडीनंतर सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c58925 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top