प्रशासनाच्या अनास्थेमुळेच माझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशासनाच्या अनास्थेमुळेच
माझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त!
प्रशासनाच्या अनास्थेमुळेच माझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त!

प्रशासनाच्या अनास्थेमुळेच माझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त!

sakal_logo
By

प्रशासनाच्या अनास्थेमुळेच
माझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त!

पुरंदर तालुक्यातील सासवड-वीर रस्त्यावरील पिंपळे या ठिकाणी शुक्रवारी (ता. २२) चालत्या दुचाकीवर वडाचे झाड कोसळून झालेल्या अपघातात माझा मुलगा रेणूकेश (वय ३०), सून रसिका (वय २७) व नात (मुलीची मुलगी) ईश्वरी देशमुख (वय ४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. चारच महिन्यांपूर्वी मुलाचे लग्न झाले होते. आकस्मिक घडलेल्या या अपघाताने माझे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. शासन व प्रशासन यांनी थोडीतरी काळजी घेतली असती, तरी माझ्या कुटुंबावर जी आज वेळ आली, ती आली नसती. हा अपघात मानवनिर्मित आहे.

- गुणशेखर अंकुशराव जाधव, परिंचे (ता. पुरंदर)

रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांची ओलसावटही लगतच्या शेतात पडत असते. त्यामुळे शेतकरी जाणीवपूर्वक ही झाडे जाळून टाकतात. ज्या ठिकाणी अपघात घडला, ते झाड तीन दिवस खोडात जळत होते. रस्त्यालगतचे शेतकरी खोडात ॲसिड टाकून खोड वाळल्यानंतर पेटवून देतात. त्यामुळे खोड कमकुवत होते. मात्र, वरील भाग ओलाच राहतो व थोडा वारा आला तरी ते झाड कोसळते. नेमका तसाच प्रकार या अपघातात घडला. पडलेले झाड अर्धवट जळालेले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने काळजी घेतली असती, तर हा अपघात टाळता आला असता.
माझ्या कुटुंबावर जी परिस्थिती ओढवली आहे, ती इतर कोणावरही ओढवू नये, असे वाटते. रस्त्यालगतच्या झाडांची जबाबदारी शेतकऱ्यांच्यावर टाकून त्यांना काही नुकसान भरपाई देता येईल का? झाडाला काही इजा झाल्यास त्या शेतकऱ्याला जबाबदार धरता येईल का? याची सर्व देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाला देवून त्यांची जबाबदारी निश्चीत केली पाहिजे. माझ्या मुलाच्या अपघाताला जो शेतकरी व बांधकाम विभागातील अधिकारी जबाबदार आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसेच, रस्त्याकडेच्या झाडांचे मॅपिंग करून धोकादायक झाडे काढून टाकणे व फांद्या छाटणे, अशी कामे करण्यासाठी निश्‍चित वार्षिक कार्यक्रम ठरविला पाहिजे.

वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे त्रास
माझ्या अभागी मुलाला, सुनेला व नातीला न्याय मिळायला हवा. मृत्यूनंतरही त्यांच्या देहाची हेळसांड झाली. सासवड येथील शासकीय तालुका आरोग्य केंद्रात त्यांचे मृतदेह विच्छेदनासाठी तीन तास टेबलावर पडून होते. तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित असतानाही तातडीने कार्यवाही झाली नाही. विच्छेदनासाठी लागणारे हॅण्डग्लोज व ब्लेडसुद्धा बाहेरून विकत आणायला लावले. या सर्व परिस्थितीचा मला खूप मानसिक त्रास झाला. ज्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे माझ्या मुलाच्या व सुनेच्या देहाची हेळसांड झाली, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c58974 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top