भोर राष्ट्रवादीची गळती थांबेना! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोर राष्ट्रवादीची गळती थांबेना!
भोर राष्ट्रवादीची गळती थांबेना!

भोर राष्ट्रवादीची गळती थांबेना!

sakal_logo
By

भोर, ता. ५ : भोर तालुक्यातील कॉंग्रेस पक्षात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून पदाधिकाऱ्यांचे व कार्यकर्त्यांचे इनकमिंग अद्यापही सुरु आहे. भाटघर धरण खोऱ्यातील जोगवडी येथील राष्ट्रवादीच्या २३ कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. यामध्ये सहा महिला कार्यकर्त्यांसह पाच ज्येष्ठांचा समावेश आहे.
जोगवडीमधील विजय किसन धुमाळ, तानाजी सूर्यकांत धुमाळ, तानाजी जगन्नाथ धुमाळ, श्रीनाथ संपत धुमाळ, मधुकर मारुती धुमाळ, तुकाराम खाशाबा धुमाळ, सुनील साहेबराव धुमाळ, विजय विठ्ठल धुमाळ, जयवंतराव जानबा धुमाळ, नवनाथ सुभाषराव धुमाळ, बबन मारुती धुमाळ, किसन नारायण धुमाळ, बबन नारायण धुमाळ, सोपान शंकर धुमाळ, दत्तात्रेय अण्‍साहेब धुमाळ, उदय ज्ञानोबा निगडे, नथू नागू धुमाळ, सोनाली तानाजी धुमाळ, जयश्री तानाजी धुमाळ, उषा विजय धुमाळ, कुसुम जयवंत धुमाळ, नंदा मुगुटराव धुमाळ, राधुबाई किसन धुमाळ यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
आमदार संग्राम थोपटे यांच्या ‘रायरेश्वर’ कार्यालयात सर्वांचे कॉग्रेस पक्षात स्वागत केले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे, पंचायत समितीचे माजी सभापती बाळासाहेब थोपटे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस सुभाष कोंढाळकर, ज्येष्ठ कार्यकर्ते नाना वीर, खरेदी-विक्री संघाचे संचालक राजेंद्र शेटे, सदाशिव धुमाळ, माउली नलावडे, बापू कामठे, कुमार सोनवणे, नथू गोरड आदी उपस्थित होते.

आतापर्यंत यांचा प्रवेश
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉग्रेसमध्ये सुरु असलेले इनकमिंग हे राष्ट्रवादी कॉग्रेस व इतर राजकीय पक्षांना विचार करायला लावणारे असल्याचे मानले जाते.
राष्ट्रवादी कॉग्रेसमधील टिटेघर येथील संतोष केळकर, म्हसर येथील सुरेश राजीवडे, केळवडे येथील शिवाजी कोंडे व बाळकृष्ण दळवी आणि देगाव येथील अशोक शेलार आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत कॉग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे.
६१३२७

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c59076 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top