निमोणे सोसायटीत राष्ट्रवादीला धक्का | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निमोणे सोसायटीत राष्ट्रवादीला धक्का
निमोणे सोसायटीत राष्ट्रवादीला धक्का

निमोणे सोसायटीत राष्ट्रवादीला धक्का

sakal_logo
By

गुनाट, ता. ४ : निमोणे (ता. शिरूर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत श्री. नागेश्वर शिवमल्हार सहकार विकास पॅनेलला भारतीय जनता पक्ष पुरस्कृत श्री. नागेश्वर जनसेवा सहकार पॅनेलने धोबीपछाड देत १२-१ असा दणदणीत विजय मिळविला. येथील ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात असूनही या पराभवामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. तर या विजयाने भाजपला स्थानिक पातळीवर नवसंजीवनी मिळाली आहे.

तब्बल १६२९ मतदार असलेली ही निवडणूक चांगलीच रंगतदार होणार असा अंदाज होता. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रवी काळे हे स्वतःच उमेदवार असल्याने या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. मात्र भाजपचे माजी सरपंच विजय भोस, पांडुरंग दुर्गे, प्रदेश सचिव दिलीप हिंगे, घोडगंगाचे माजी उपाध्यक्ष यमराज काळे, जालिंदर काळे, संतोष काळे, श्रीधर साळुंखे, लक्ष्मण काळे आदींनी मतदारांना विश्वासात घेऊन नियोजनबद्ध प्रचार करत मोठ्या फरकाने विजय मिळविला. तर राष्ट्रवादीला केवळ काळे यांच्या एकमेव निसटत्या विजयावरच समाधान मानावे लागले.

एका तालुकाध्यक्षाचा विजय एकाचा पराभव
केवळ दोनच महिन्यांपूर्वी आबासाहेब सोनवणे यांनी भाजपचा तालुकाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर महिनाभरापूर्वी झालेल्या आपल्या निर्वी (ता. शिरूर) येथील सोसायटीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा १३-० असा पराभव करत पक्षाचा निर्णय सार्थ ठरवला. तर सहा-सात वर्षे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष म्हणून पदभार पाहूनही काळे यांना गावच्या पक्षपुरस्कृत पॅनेलला विजय मिळवून देता आला नाही.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c59599 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top