‘इस्लाममध्ये शांती व एकतेला महत्त्व’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘इस्लाममध्ये शांती व एकतेला महत्त्व’
‘इस्लाममध्ये शांती व एकतेला महत्त्व’

‘इस्लाममध्ये शांती व एकतेला महत्त्व’

sakal_logo
By

वाल्हे, ता. ५: वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. मुस्लीम बांधवांनी नमाज अदा करून मानवजातीच्या कल्याणासाठी दुवा मागितली.
वाल्हे येथील शाही सुन्नी मशिदीमध्ये मौलाना शकील शेख यांच्या उपस्थितीत सामुहिक नमाजपठण झाले. वाल्हेसह पिंगोरी, दौंडज, जेऊर, मांडकी येथील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाल्हे येथील शाही सुन्नी मशिदीमध्ये महिनाभर ‘तराबी’ पार पाडणारे मौलाना शकील शेख यांनी नमाज पठण केले.
इस्लाम प्रेम, शांती व एकतेचा संदेश देत आला असून त्याचे अनुपालन महत्त्वाचे आहे. परस्परांना मदत करण्यासह मानवतेचा धर्म पाळावा. दैनंदिन जीवनात आपणाकडून कळत-नकळतपणे जे अपराध होतात त्यासाठी क्षमा मागावी, इस्लाममध्ये शांती व एकतेला महत्त्व असल्याचे मौलाना शकील शेख यांनी सांगितले.
नमाजपठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या. दरम्यान यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे, सरपंच अमोल खवले, सूर्यकांत पवार, राहुल यादव, सागर भुजबळ, प्रा. संतोष नवले, संदेश पवार आदींनी मुस्लिम बांधवांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.
यानिमित्त हिंदू बांधवांनी मुस्लिम बांधवांकडे जाऊन शिरखुर्म्याचा आस्वाद घेतला. यावेळी गडचिरोलीचे तहसीलदार समशेर पठाण, सरवरखान पठाण, सुकलवाडी सोसायटीचे उपाध्यक्ष अस्लम पठाण, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सलमान पठाण, महमूद इनामदार, रमजान आतार, इकबाल आतार, चाँदभाई शेख, मुनीर पठाण, जमील शेख, अस्लम नदाफ, अभिषेक दुर्गाडे आदि मुस्लिम बांधव उपस्थित होते.
दरम्यान वाल्हे पोलिस औटपोस्टचे हवालदार केशव जगताप, संतोष मदने, प्रशांत पवार, होमगार्ड पोपट पाटोळे, महादेव मगर यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c59609 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top