थोपटे पिता-पुत्राचे अर्ज अखेर वैध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

थोपटे पिता-पुत्राचे अर्ज अखेर वैध
थोपटे पिता-पुत्राचे अर्ज अखेर वैध

थोपटे पिता-पुत्राचे अर्ज अखेर वैध

sakal_logo
By

भोर, ता. ३ : अनंतनगर-निगडे (ता. भोर) येथील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकरिता दाखल केलेल्या अर्जांच्या छाननी प्रक्रियेत ११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. तर, १९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अवैध अर्जांमध्ये भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या उमेदवारांचा समावेश आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या कार्यालयात सोमवारी (ता. २) सकाळी ११ वाजता अर्जांच्या छाननीस सुरुवात झाल्यानंतर रात्री उशिरा सर्व हरकतींवर निकाल देण्यात आले. उमेदवारी अर्जांवर कॉंग्रेस व विरोधी पक्षांनी एकमेकांच्या उमेदवारांच्या अर्जावर घेतलेल्या हरकतींमुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर पेच निर्माण झाला होता. त्यामुळे अर्जाच्या छाननीचा निकाल देण्यास सात-आठ तासांचा कालावधी लागला. राजगडच्या १७ जागांसाठी एकूण ४५ अर्ज दाखल झाले होते.
विरोधी पक्षातील भाजप, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना यांनी कॉंग्रेसचे कारखान्याचे संस्थापक अनंतराव थोपटे, विद्यमान संचालक व आमदार संग्राम थोपटे, सोमनाथ वचकल, पोपट सुके, विकास कोंडे, दत्तात्रेय भिलारे, शैलेश सोनवणे, किसन सोनवणे यांच्या अर्जावर हरकत घेतली. राजगड कारखान्यावर पुणे जिल्हा सहकारी बँक आणि शिखर बँकेचे सुमारे १५ कोटींचे कर्ज थकीत आहे. त्यावेळी वरील आठ उमेदवार हे तत्कालीन संचालक होते. अर्जामध्ये वरील सातही उमेदवारांनी जिल्हा बँक व शिखर बँकेचा थकबाकीदार नसल्याचा दाखला जोडलेला नाही. त्यामुळे या सात संचालकांना अपात्र ठरवावेत, अशी प्रकारची हरकत विरोधकांनी घेतली. तर, कॉंग्रेसकडून विरोधी पक्षाच्या १६ उमेदवारांच्या अर्जावर हरकत घेतली. विकास सोसायटी व बँकांची थकीत कर्जदार, सलग तीन वर्षे ऊस कारखान्यास घातलेला नाही आणि कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेरील इतर कारखान्यास ऊस दिला, अशा प्रकारची कारणे हरकतींमध्ये दिली. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार बुधवारी (ता. ४) सकाळी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी सांगितले.

अर्ज अवैध ठरलेले उमेदवार- दिलीप रेणुसे, दत्तात्रेय पांगारे, रमेश खुटवड, ज्ञानेश्वर बागल, विलास बांदल, राजेश गायकवाड, रामचंद्र कुडले, शिवाजी बांदल, राजाराम कांबळे, अलका मालुसरे व राजेश राऊत.
अर्ज वैध ठरलेले उमेदवार- संग्राम थोपटे, अनंतराव थोपटे, दिनकर धरपाळे, अशोक शेलार, संभाजी मांगडे, संदीप नगीने, प्रताप शिळीमकर, शिवाजी कोंडे, विकास कोंडे, शैलेश सोनवणे, पोपटराव सुके, सोमनाथ वचकल, उत्तम थोपटे, विठ्ठल कुडले, शोभा जाधव, सुरेखा निगडे, किसन शिनगारे, संदीप नगीने व दत्तात्रेय भिलारे.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्जांच्या छाननीत आमच्या हरकतींवर योग्य तो निर्णय दिला नाही. त्यामुळे या प्रक्रियेबद्दल आणि निर्णयाबद्दल आम्ही न्यायालयात आव्हान देणार आहे.
- जीवन कोंडे, भाजप तालुकाध्यक्ष, भोर

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c59707 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top