मावळमधील दोघांचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मावळमधील 
दोघांचे यश
मावळमधील दोघांचे यश

मावळमधील दोघांचे यश

sakal_logo
By

वडगाव मावळ, ता. २७ : बंगलोर येथे झालेल्या दुसऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत वडगाव येथील चिराग बापूसाहेब वाघवले या खेळाडूने १०२ किलो वजन गटात सुवर्ण तर महेश असवले याने ६७ किलो वजन गटात रौप्य पदक पटकावले. त्यांच्या या कामगिरीचे मावळ तालुक्यात कौतुक होत आहे.
चिरागने १०२ किलो वजनी गटात १३९ किलो स्नॅच व १७५ किलो क्लीन जर्क, असे एकूण ३१४ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. महेश असवले याने मुलांच्या ६७ किलो वजनी गटात एकूण २६४ किलो वजन उचलून रौप्यपदक मिळविले. चिराग हा येथील सह्याद्री जिमखान्यात क्रीडा प्रशिक्षक सुनील चव्हाण, बाळासाहेब चव्हाण व बापूसाहेब वाघवले यांच्या मार्गदर्शनाखाली तर महेश हा येथील दुबेज गुरुकुल येथे बिहारीलाल दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c59836 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top