‘राजगड’चे किल्लेदार थोपटेच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘राजगड’चे किल्लेदार थोपटेच!
‘राजगड’चे किल्लेदार थोपटेच!

‘राजगड’चे किल्लेदार थोपटेच!

sakal_logo
By

भोर, ता. ४ : अनंतनगर-निगडे (ता. भोर) येथील राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकरिता दाखल केलेल्या अर्जांच्या छाननी प्रक्रियेनंतर १७ जागांसाठी ३१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले, तर १४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. त्यानुसार कॉंग्रेसचे १४ उमेदवार बिनविरोध होणार, हे निश्‍चित झाले असून, उर्वरित चार जागांसाठी निवडणूक लागणार का, याची उत्सुकता आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी बुधवारी (ता. ४) सकाळी वैध उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानुसार गट क्रमांक २ (येवली-हातवे बुद्रुक) या मतदारसंघात सर्वाधिक ७ उमेदवार आहेत. अवैध उमेदवारांमध्ये रामचंद्र कुडले, शिवाजी बांदल, सोमनाथ वचकल, विलास बांदल, बाळासाहेब गरुड, ज्ञानेश्वर बागल, सुरेश खुटवड, दिलीप रेणुसे, दत्तात्रेय पांगारे, मनोज निगडे, राजेश गायकवाड, राजाराम कांबळे, अलका मालुसरे व राजेश राऊत आदींचा समावेश आहे.
सद्यःस्थितीत कारखान्याच्या निवडणुकीत कॉंग्रेसचे १४ उमेदवार बिनविरोध विजयी होणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. यामध्ये भटक्या विमुक्त जाती व जमाती आणि अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात प्रत्येक एक आणि महिला राखीव मतदारसंघातील २, असे एकूण ४ उमेदवार, तर उत्पादक गटातील ९ जागांवर फक्त कॉंग्रेसचेच अर्ज आहेत. तसेच, सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था या गटात संग्राम थोपटे व अनंतराव थोपटे यांचाच अर्ज आहे.

१८ मेपर्यंत माघार
फक्त चार जागांसाठीच निवडणूक होणार आहे. यामध्ये गट क्रमांक ३ सारोळा-गुणंद-खंडाळा आणि गट क्रमांक ५ रुळे-वरसगाव-पानशेत या मतदारसंघातील प्रत्येकी २ उमेदवारांचा समावेश आहे. अर्ज माघारी घेण्याची मुदत १८ मेपर्यंत असून, १९ मे रोजी अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास २९ मे रोजी मतदान होणार आहे.

मतदारसंघनिहाय वैध उमेदवार व कंसात गावाचे नाव- व्यक्ती उत्पादक मतदारसंघ- गट क्रमांक १- देवपाल- उत्तम थोपटे (खानापूर), किसन शिनगारे (कर्नावड), सुभाष कोंढाळकर (चिखलावडे) व विठ्ठल कुडले (करंजे).
गट क्रमांक २- येवली-हातवे बुद्रुक- पोपटराव सुके (अनंतनगर-निगडे), संग्राम थोपटे (भोर), सोमनाथ वचकल (संगमनेर), दत्तात्रेय भिलारे (किकवी), सुधीर खोपडे (वडगाव डाळ), संजय भिलारे (भिलारवाडी-हातवे बुद्रुक), पंडित बाठे (केंजळ).
गट क्रमांक ३- सारोळा-गुणंद-खंडाळा- किसनराव सोनवणे, दत्तात्रेय चव्हाण व शैलेश सोनवणे (तिघेही न्हावी).
गट क्रमांक ४- कापूरव्होळ-वेळू-हवेली- विकास कोंडे (खेड शिवापूर), शिवाजी कोंडे (केळावडे), दिलीप कोंडे (नायगाव).
गट क्रमांक ५- रुळे-वरसगाव-पानशेत- दिनकर धरपाळे (वांजळे, ता. वेल्हे), संभाजी मांगडे (मांगदरी-वेल्हे), प्रताप शिळीमकर (वाजेघर-वेल्हे), संदीप नगीने (वेल्हे) व रामदास गायकवाड (सोंडे माथना-वेल्हे).
मतदारसंघ ब वर्ग सहकारी उत्पादक, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था- संग्राम थोपटे (भोर) व अनंतराव थोपटे (भोर).
मतदारसंघ अनुसूचित जाती-जमाती- अशोक शेलार (देगाव).
मतदारसंघ महिला राखीव- सुरेखा निगडे (गुणंद) व शोभा जाधव (वेल्हे).
मतदारसंघ इतर मागासवर्गीय प्रतिनिधी- किसन शिनगारे (कर्नावड), सोमनाथ वचकल (माळवाडी) व संदीप नगिने (वेल्हे).
मतदारसंघ भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागासवर्ग प्रतिनिधी- चंद्रकांत सागळे (भोर).

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c60164 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top