सुकलवाडीत मुस्लीम बांधवांना खजूर वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुकलवाडीत मुस्लीम बांधवांना खजूर वाटप
सुकलवाडीत मुस्लीम बांधवांना खजूर वाटप

सुकलवाडीत मुस्लीम बांधवांना खजूर वाटप

sakal_logo
By

वाल्हे, ता. ५: लोकशाहीतील समता, बंधुता, स्वातंत्र्य ही मूल्ये सोशल मिडीयाच्या संदेशांपुरती मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जीवनात त्यांचा अंगीकार करणे आवश्यक असल्याचे विचार जागृती फाउंडेशन व आम्ही संवादी (आस) संस्थेचे कार्याध्यक्ष श्रीकांत लक्ष्मीशंकर यांनी सांगितले.
रमजान ईदनिमित्त जागृती फाउंडेशन व आम्ही संवादी (आस) संस्थेच्या माध्यमातून सुकलवाडी (ता. पुरंदर) येथील मुस्लिम बांधवांना रोजानिमित्त फळांसह खजुराचे वाटप करण्यात आले. त्यावेळी लक्ष्मीशंकर बोलत होते. याप्रसंगी संस्थेचे सचिव धनंजय परशुराम पवार, खजिनदार संतोष पवार, दिलीप पवार, देविदास सुर्वे, नितीन पवार, अजित पवार, नासिरखान पठाण, आरिफ पठाण आदि उपस्थित होते.
आपण सर्वजण एकत्र आहोत, ही भावना मनात ठेऊन पुढे जाण्याची गरज असून याचा सर्व भारतीयांनी गांभीर्याने विचार करण्याची आता वेळ आल्याचे लक्ष्मीशंकर यांनी सांगितले. संस्थेचे सचिव धनंजय पवार यांनी प्रास्ताविक केले.

PNE22S62103

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c60318 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top