विहिरीत पडलेल्या उदमांजरला जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विहिरीत पडलेल्या 
उदमांजरला जीवदान
विहिरीत पडलेल्या उदमांजरला जीवदान

विहिरीत पडलेल्या उदमांजरला जीवदान

sakal_logo
By

वरवंड, ता. ५ : पडवी (ता. दौंड) येथे विहिरीत पडलेल्या उदमांजराला वनकर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवीत काही स्थानिक तरुणांच्या मदतीने सुखरूप बाहेर काढले.
पडवी येथे पाण्याच्या शोधात आलेले उदमांजर विहिरीत पडले होते. विहिरीत पाणी कमी असल्याने ते बाजूच्या कपारीचा आधार घेऊन बसले. मात्र, विहीर खोल असल्याने त्याला वरती येणे दुरापस्त झाले. सकाळी एका शेतकऱ्याला विहिरीत एक वन्यप्राणी ओरडत असल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी वनविभागाला माहिती दिली. दौंड प्रादेशिक वनविभागाच्या वनपरिमंडल अधिकारी शीतल खेंडके व शीतल मेरगळ, नौशाद शेख, अविनाश वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी स्थानिक तरुण महेश शितोळे व इतर दोन तरुणांनी वनपथकाला मदत केली. विहिरीत उतरणे अवघड असतानाही मोठ्या शिताफीने उदमांजराला बाहेर काढले. त्यानंतर त्याला वनविभागाच्या क्षेत्रात सोडण्यात आले. ते नरजातीचे अंदाजे दीड वर्ष वयाचे होते.

सध्या पाण्याच्या शोधात वन्यजीव लोकवस्ती व शेतशिवारात शिरकाव करीत आहे. विहिरीत पडल्यास किंवा संबंधित वन्यप्राण्याला काही धोका निर्माण झाल्यास वनविभागाशी संपर्क साधावा.’’
- शीतल खेंडके, वनपरिमंडल अधिकारी, दौंड

PNE22S62198

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c60522 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top