
पिंगोरी सोसायटी निवडणूक बिनविरोध
वाल्हे, ता. ९ : पिंगोरी (ता. पुरंदर) येथील पिंगोरी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अकरा सदस्यांची निवडणूक बिनविरोध झाली. त्यासाठी पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी प्रयत्न केले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यु. एन. मदने यांनी काम पाहिले. बिनविरोध संचालकांमध्ये महादेव विठ्ठल शिंदे, अप्पा सीताराम यादव, सिंधूताई चंद्रकांत ननावरे, भारती अरुण यादव, लालासाहेब पांडुरंग शिंदे, बबन एकनाथ शिंदे, कैलास निवृत्ती गायकवाड, राजेंद्र सुदाम शिंदे, कल्याण रामचंद्र धुमाळ, संतोष अंकुश यादव, अजय मुकुंद भोसले यांना संधी मिळाली. निवडीनंतर सासवड येथे प्रदेश काँग्रेस युवकचे महासचिव गणेश जगताप यांच्या हस्ते पेढे भरवून नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संभाजी काळाणे, विठ्ठल मोकाशी, सतीश शिंदे, दत्ताराजे शिंदे, राजकुमार शिंदे, हरिश्चंद्र यादव, दशरथ यादव, मोहन शिंदे, अनिल गायकवाड, मंगेश शिंदे उपस्थित होते. नवनिर्वाचित संचालकांचे माजी सभापती नंदूकाका जगताप, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रदीप पोमण, पुरंदर नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक अनिल उरवणे, अॅड. विजय भालेराव आदींनी अभिनंदन केले.
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c60527 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..