ज्योती कंधारे यांचे राष्ट्रीय स्पर्धेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्योती कंधारे यांचे
राष्ट्रीय स्पर्धेत यश
ज्योती कंधारे यांचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

ज्योती कंधारे यांचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : केरळमध्ये झालेल्या राष्ट्रीय क्लासिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन २०२१-२२ या स्पर्धेत कोंढावळे (ता. मुळशी) येथील ज्योती दीपक कंधारे यांनी महिलांच्या ५२ किलो वजन गटात सुवर्ण पदक मिळवले.
केरळमधील अलप्पुझा शहरात झालेल्या या राष्ट्रीय क्लासिक पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेत ज्योती कंधारे यांनी महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी या स्पर्धेतील ५२ किलो गटात वयाच्या ४० वर्षी सुवर्ण पदक मिळवले. त्यांनी आतापर्यंत राष्ट्रीय स्पर्धेत ५ सुवर्ण, २ रौप्य आणि २ ब्रॉंझ पदके, अशी एकूण ९ पदके मिळवली आहे. त्यांच्या या यशाचे मुळशी तालुक्यात कौतुक होत आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c60755 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top