
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना डिजिटल फ्रीलान्सरची संधी
उरुळी कांचन, ता. ६ : ‘‘विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग करून आत्मनिर्भर व्हावे. डिजिटल युगातील रोजगाराच्या संधी, संभाषण कौशल्य, मुलाखत कौशल्य, संवाद कौशल्य हे आत्मसात करणे गरजेचे आहे. डिजिटल फ्रीलान्सरद्वारे विद्यार्थ्यांनी ‘कमवा व शिका’ या तत्त्वाचा अवलंब करून व्यक्तिमत्त्व विकास साधावा,’’ असे आवाहन ‘एमकेसीएल’चे मार्केटिंग मॅनेजर राहुल कुलकर्णी यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या ‘प्लेसमेंट सेल’ विभागाच्या वतीने शनिवारी (ता. २३) ‘आत्मनिर्भर विद्यार्थी’ या विषयावर कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी प्राचार्य डॉ. रमेश अडसूळ, आयक्यूएसी समन्वयक प्रा. नंदकिशोर मेटे, प्रा. प्रवीण नागवडे, प्रा. रोहिणी शिंदे, प्रा. ज्ञानेश्वर पिंजारी, प्रा. प्रदीप राजपूत, प्रा. सुजाता गायकवाड आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. समीर आबनावे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनुजा झाटे यांनी आभार मानले.
यावेळी प्राचार्य डॉ. अडसूळ म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांनी कौशल्याधिष्ठित शिक्षण घेऊन आत्मनिर्भर व्हावे, यासाठी वेगळ्या कार्यशाळांचे आयोजन महाविद्यालयात होत आहे. या उपक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे व आपल्या व्यावसायिक संधी शोधाव्यात.’’
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c60766 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..