
भोरमध्ये धार्मिक सलोखा मेळावा
भोर, ता. ७ ः रमजान ईदनिमित्त येथील फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळ आणि समविचारी संस्थांच्या वतीने धार्मिक सलोखा मेळाव्यात मुस्लिम बांधवांना कुराणाच्या मराठी आवृत्तीची प्रत आणि भारतीय संविधानाचे वाटप करण्यात आले. स्मृतिशेष शुभांगद गोरेगावकर स्मृती रुग्णालय आणि मुस्लिम संघटनेच्या वतीने येथील हॉटेल सोनाली गार्डनमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात माजी नगरसेवक निसार नालबंद, ग्राहक पंचायतीचे जमीर आतार, सलीम केबटचे सलीमभाई आतार, दिलावर काझी, इब्राईम आतार, आस्लम शेख, डॉ. इरफान खान, समीर सय्यद, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा हसीना आतार आदींचा कुराणाची व संविधानाची प्रत देऊन सत्कार करण्यात आला. सकाळ वृत्तपत्र समुहामार्फत महाराष्ट्र आयडॉल पुरस्कार मिळाल्याबद्दल आशा भोंग, अॅड. जयश्री शिंदे व डॉ. इम्रान खान यांचा फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळाकडून विशेष सत्कार करण्यात आला. ज्ञानोबा घोणे, रवींद्र भालेराव, ओंकार गवळी, डॉ. प्रदीप पाटील, विजया पाटील, विठ्ठल टिळेकर आदींनी या कार्यक्रमाचे नियोजन केले.
मुस्लिम संघटनेचे अध्यक्ष कासमभाई आतार, डॉ. सुरेश गोरेगावकर, फुले, शाहू, आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव, उपविभागीय वन अधिकारी आशा भोंग, माजी नगराध्यक्षा अॅड. जयश्री शिंदे, डॉ. इम्रान खान आदी मान्यवर उपस्थित होते.
62375
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c60768 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..