
राजर्षी शाहू महाराजांना भोर येथे आदरांजली
भोर, ता. ७ ः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शंभराव्या पुण्यतिथीनिमित्त भोरमध्ये १०० मिनिटे स्तब्ध राहून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. येथील फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाच्या वतीने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
येथील राजगड ज्ञानपीठाच्या अनंतराव थोपटे महाविद्यालयात शनिवारी सकाळी १० वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कोल्हापूर येथील राजर्षी शाहू शताब्दी समितीच्या मार्गदर्शनानुसार सकाळी १० वाजता १०० सेकंद स्तब्धता पाळण्यात आली. या कार्यक्रमास फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. रोहिदास जाधव, डॉ. सुरेश गोरेगावकर, ज्ञानोबा घोणे, प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, डॉ. प्रदीप पाटील, डॉ. अरुण बुरांडे, प्रा. रवींद्र भालेराव, विठ्ठल टिळेकर, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ. संदीप उल्हाळकर व डॉ. पल्लवी मळेकर आदींसह राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आणि महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
62484
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c60917 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..