एसआरए प्रकल्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसआरए प्रकल्प
एसआरए प्रकल्प

एसआरए प्रकल्प

sakal_logo
By

‘‘शहरातील एसआरए प्रकल्प राजकीय लोकांमुळे रखडले आहेत. नियोजनशून्य कारभारामुळे हजारो झोपडपट्टीवासीयांना एसआरए योजनेंतर्गत घरे मिळण्यास विलंब होत आहे. अनेक लाभार्थींना विकसक घरभाडेदेखील देत नाही. एसआरएमधील झोपडीधारकांना नाहक वेठीस धरण्याचे प्रकार सर्रास सुरू असून, प्रकल्प रखडत आहे. सरकार बदलले की प्रकल्‍प रखडतात. पुनर्विकासाच्या माध्यमातून एक दिवस कायापालट होईल, अशी या रहिवाशांना आशा आहे. मात्र, त्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात काही उतरताना दिसत नाही.’’
- सुंदर कांबळे, रहिवासी पत्राशेड पुनर्वसन प्रकल्प लिंक रोड


‘‘सरकारी योजना, प्रकल्प आणि वादविवाद हातात हात घालूनच येतात. काहीवेळेला योजना राबवताना वाद विकोपाला जाऊन नंतर प्रकरण पोलिस ठाणे आणि न्यायालयापर्यंत पोहचते. मग वर्षानुवर्षे टोलेजंग इमारतींचा प्रकल्प असाच स्वप्नवत उभा राहतो. नागरिकांच्या घरातील पाणी, वीज कनेक्शन खंडित करतात. याकडे महापलिका दुर्लक्ष करते. नोकरशाही आणि राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, तसेच उदासीन धोरण पुनर्विकासाला ‘घरघर’ लावण्यास कारणीभूत आहेत. पण, इतरही अनेक तांत्रिक अडचणीही याला कारणीभूत आहेत. बिल्डरांनी या संधीचा पुरेपूर फायदा उठवीत आहेत.’’
- राहुल वडमारे, रहिवासी, मिलिंदनगर एसआरए प्रकल्प

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c61222 Txt Maval

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top