मांडकीत २८ वर्षांनी भरला तोच वर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मांडकीत २८ वर्षांनी भरला तोच वर्ग
मांडकीत २८ वर्षांनी भरला तोच वर्ग

मांडकीत २८ वर्षांनी भरला तोच वर्ग

sakal_logo
By

वाल्हे, ता. ९ : मांडकी (ता. पुरंदर) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लीश स्कूल मधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच झाला. २८ वर्षांनी पुन्हा तेच विद्यार्थी एकत्र येत त्यांनी आठवणींना उजाळा दिला. सर्व विद्यार्थी व्यावसाय, नोकरीमध्ये स्थिर झाले आहेत. काहीजण पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, बारामती आदि ठिकाणी स्थायिक झाले आहेत. मेळाव्यानिमित्त सर्वजण एकत्र जमले होते या वेळी शाळेतील सुविधा व गरीब विद्यार्थ्यांसाठी मदत करण्याचे सर्वांनी ठरविले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तत्कालीन शिक्षिका रेखा भागवत होत्या. कार्यक्रमाच्या सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराज व संस्थेचे संस्थापक बा. रा. घोलप यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी जे. बी. शेख, एस. एल. भोसले, बाबासाहेब भोसले, मीना शिरगावे, पोलिस पाटील प्रवीण जगताप उपस्थित होते. तर विलास पिलाणे, श्रीकांत जगताप, प्रवीण मोरे, सोमनाथ वाघ, धनाजी शेटे, अनिता पवार, इंदूमती साळुंखे, जयश्री पवार, कल्पना चव्हाण, वंदना हिंगे, जनाबाई धुमाळ, पुष्पा गायकवाड आदि उपस्थित होते. यावेळी तत्कालीन शिक्षकांचा पुष्पहार, शाल श्रीफळ व पुस्तके देऊन सन्मान करण्यात आला.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c61456 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top