''भोर एज्युकेशन''ची कार्यकारणी बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''भोर एज्युकेशन''ची कार्यकारणी बिनविरोध
''भोर एज्युकेशन''ची कार्यकारणी बिनविरोध

''भोर एज्युकेशन''ची कार्यकारणी बिनविरोध

sakal_logo
By

भोर, ता. १० : येथील सर्वात जुन्या समजल्या जाणाऱ्या भोर एज्युकेशन सोसायटीच्या नवीन कार्यकारणीच्या सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गुजर यांनी दिली. संस्थेच्या राजा रघुनाथराव विद्यालयाच्या सभागृहात रविवारी (ता.८) दुपारी निवडणूक प्रक्रीया पार पडली.
तीन वर्षांच्या कालावधीसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेचे अध्यक्ष राजेशराजे पंतसचिव यांनी काम पाहिले. नवीन कार्यकारणीत ६ उपाध्यक्ष आणि १३ संचालक आहेत. निवडणूकीसाठी जेवढ्या जागा तेवढेच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेशराजे पंतसचिव यांनी जाहीर केले.
भोर एज्युकेशन सोसायटीच्या काही माजी सदस्यांनी ही निवडणूक बेकायदेशीर असल्याबाबतचे अपील उच्च न्यायालयात केले होते. मात्र, न्यायालयाने ते फेटाळले आणि संस्थेच्या कार्यकारणीचा चेंज रिपोर्ट १६ आठवड्यात सादर करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांना दिले.
दरम्यान, संस्थेच्या आजपर्यंतच्या कालावधीत प्रकाश ओर आणि शशिकांत कंक यांची प्रथमच संचालक म्हणून निवड झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष राजेशराजे पंतसचिव यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार केला.
भोर एज्युकेशन सोसायटीच्या नवीन कार्यकरणीतील उपाध्यक्ष पुढीलप्रमाणे : विलासराव कृष्णराव बांदल, मिलिंद रसिकलाल शहा, अरविंद महादेव गुजर, अशोक काळे, मधूकर पैठणकर व विजय मांढरे.
नवीन कार्यकारणीतील सदस्य पुढीप्रमाणे : सुरेश नटवरलात शहा, सुरेश विष्णूदास देवी, डॉ. अण्णासाहेब चंगळआप्पा विराजदार, सुरेश रामचंद्र गोरेगांवकर, डॉ. प्रदीप रामचंद्र पाटील, डॉ. उदय गोवर्धन शेठ, नितीन नटवरलाल शहा, प्रमोद गजानन गुजर, विकास बबनराव मांढरे, गजानन बाबूराव झगडे, अॅड. मुकुंद पोडोपंत तांबेकर, प्रकाश पोपटलाल ओर आणि शशिकांत रामभाऊ कंक.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c61577 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top