
पिंगोरीच्या वाघेश्वरी मंदिरात चांदीचे मखर
वाल्हे, ता. १० : पिंगोरी (ता. पुरंदर) येथील ग्रामदैवत श्री वाघेश्वरी देवीस सहकारमहर्षी माजी आमदार चंदुकाका जगताप यांच्या स्मरणार्थ पुरंदर-हवेलीचे आमदार संजय जगताप व सासवडच्या माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांच्या वतीने चांदीचे मखर अर्पण करण्यात आले.
वाघेश्वरी या ग्रामदैवतेला चांदीचे मखर अर्पण करण्याची इच्छा सासवडच्या आनंदी जगताप यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर गावातील पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा करून मंदिराच्या गाभाऱ्यात चांदीची मखर बसविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार नुकतेच ही मखर बसवून संकल्पाची पूर्तता केल्याची माहिती सतीश शिंदे यांनी दिली.
या प्रसंगी दत्ताराजे शिंदे, प्रवीण शिंदे, योगेश शिंदे, प्रदिप गायकवाड, मयूर शिंदे, पोपट शिंदे आदि उपस्थित होते.
वाघेश्वरी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये बसविण्यात आलेल्या चांदीच्या मखरामुळे मंदिराच्या वैभवात भर पडली असल्याचे दत्ताराजे शिंदे यांनी सांगितले.
63078
Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c61727 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..