ना विमा काढलेला, ना आरटीओ टॅक्स भरलेला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ना विमा काढलेला, ना आरटीओ टॅक्स भरलेला
ना विमा काढलेला, ना आरटीओ टॅक्स भरलेला

ना विमा काढलेला, ना आरटीओ टॅक्स भरलेला

sakal_logo
By

भोर, ता. १० ः शहर आणि तालुक्यात नियमांचे उल्लंघन करीत सुरु असलेले जेसीबी व डंपर आणि त्यावरील विनापरवानाधारक चालक यांच्यावर कारवाई करण्यास प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. रस्त्यांच्या कामासाठी, पाइपलाइन, गटारे, शेती, विहीर खोदणे, डोंगर सपाटीकरण आदी प्रमुख कामांसाठी जेसीबी आणि डंपरची आवश्यकता असते. ही कामे करण्यासाठी सर्रास जेसीबी व डंपरचा उपयोग केला जातो. परंतु, इतर वाहनांसारखे जेसीबी चालकाकडे वाहन परवाना नसतो, जेसीबीचा विमा काढलेला नसतो आणि आरटीओ टॅक्सही भरलेला नसतो.
जेसीबीकडून अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना विमा कव्हरेज मिळत नाही. याकडे प्रशासनाच्या सर्व विभागांकडून दुर्लक्ष केले जात आहे. सध्या जेसीबीच्या तासाच्या कालावधीसाठी बाराशे रुपये मोजावे लागतात. माती, दगड व इतर राडारोडा हटविण्यासाठी आणि रस्त्यांच्या कामासाठी जेसीबीसोबत डंपरचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तालुक्यात माती, वीटभट्टीची राख, खडी, क्रश सॅण्ड या कामासाठी डंपरचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. राखेचा डंपर गटारात खचल्याच्या आणि खडी व मातीचा डंपर रस्त्यावर पलटी झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. या महिन्यात विहिरीत जेसीबी पडल्याची आणि रस्त्यावर खडीचा डंपर पलटी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र वित्तहानी वारंवार होत आहे. तरीही संबंधित जेसीबी आणि डंपरचालकावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. संबंधित वाहनांच्या कागदपत्रांची खात्रीही प्रशासनाने केली नाही. यापुढे अशा जेसीबी व डंपरचालकाकडून मोठा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी कोणावर राहील? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शासनाच्या पोलिस, महसूल, आरटीओ आणि नगरपालिका व ग्रामपंचायत विभागांनी याकडे गांभिर्याने पाहणे क्रमप्राप्त झाले आहे.
63090

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c61751 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top