पेठच्या उपसरपंचपदी जयश्री चौधरी बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेठच्या उपसरपंचपदी 
जयश्री चौधरी बिनविरोध
पेठच्या उपसरपंचपदी जयश्री चौधरी बिनविरोध

पेठच्या उपसरपंचपदी जयश्री चौधरी बिनविरोध

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. ९ : पेठ (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जयश्री लक्ष्मण चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. जयश्री लक्ष्मण चौधरी यांना दुसऱ्यांदा हा बहुमान मिळाला आहे.
पेठच्या उपसरपंच विजया शरद चौधरी यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदाच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया झाली. त्यात जयश्री चौधरी यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामविकास अधिकारी नंदकुमार चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली. यावेळी सरपंच सूरज चौधरी, ग्रामपंचायत सदस्य तानाजी चौधरी, काळुराम चौधरी, शोभा चौधरी, वर्षाराणी चौधरी, मोनिका चौधरी, लक्ष्मीबाई गायकवाड, ग्रामसेवक नंदकुमार चव्हाण, नायगाव पेठचे माजी सरपंच रघुनाथ चौधरी, यशवंत कारखान्याचे संचालक रघुनाथ चौधरी, माजी सरपंच महादेव चौधरी, माजी उपसरपंच भालचंद्र चौधरी, माजी सरपंच बापूसाहेब चौधरी, बाबूराव गायकवाड, पोलिस पाटील दत्तात्रेय चौधरी, तंटामुक्तीचे अध्यक्ष तुळशीराम चौधरी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c61778 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top