भारतमातेच्या जयघोषाने निमोणे गाव दणाणले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतमातेच्या जयघोषाने निमोणे गाव दणाणले
भारतमातेच्या जयघोषाने निमोणे गाव दणाणले

भारतमातेच्या जयघोषाने निमोणे गाव दणाणले

sakal_logo
By

गुनाट, ता. ११ ः ...विविधरंगी फुलांनी सजवलेला रथ, त्याच्यासमोर बँडबाजा लावून निघालेली मिरवणूक व रथावर होणारी पुष्पवृष्टी आणि नागरिकांची अफाट गर्दी आणि भारतमातेच्या घोषणांनी दणाणलेला परिसर हे विलोभनीय दृश्य तब्बल 26 वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले सैनिक शिवाजी राजाराम जाधव यांच्या स्वागताप्रसंगीचे आहे.
निमोणे (ता. शिरूर) येथील निमोणे आयडॉल ग्रुपच्या प्रा. बाळासाहेब गायकवाड, प्रा. गौतम दळवी, नवनाथ गव्हाणे, महावीर कोठारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने सेवानिवृत्त झालेल्या शिवाजी जाधव यांचे गावात अनोख्या पद्धतीने स्वागत केले. या कार्यक्रमाला सरपंच संजय काळे, माजी सरपंच विजय भोस, लेफ्टनंट सुभेदार दीपक शेळके, मेजर प्रभाकर सोनवणे, मेजर सोमनाथ मातेरे, नायब सुभेदार सुनील चव्हाण यांसह ग्रामस्थ व अनेक आजी माजी सैनिकांनी उपस्थिती दर्शवली.
सैनिकांच्या निवृत्तीनंतरच्या जीवनासाठी शासन अनेक योजना राबवते. त्या योजनांचा लाभ सैनिकांनी घ्यावा असे आवाहन लेफ्टनंट कर्नल दीपक शेळके यांनी केले. स्वागत सरपंच संजय काळे, सूत्रसंचालन प्रा. गौतम दळवी यांनी तर बाळासाहेब जाधव यांनी आभार मानले.

देशासाठी सैन्यदलाच्या माध्यमातून सेवा करणे हेच आयुष्याचे मुख्य ध्येय होते. त्यात जन्मभूमी असलेल्या निमोणे ग्रामस्थांनी ज्या आपुलकीने, मायेने स्वागत केले, त्याने भारावून गेलो आहे. यापुढे गावासाठीही योगदान देणार आहे.
-शिवाजी जाधव, सेवानिवृत्त सैनिक, निमोणे.
63254

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c62004 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top