कळंबमधील आखाड्यात मुलींच्या कुस्त्या लक्षवेधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कळंबमधील आखाड्यात 
मुलींच्या कुस्त्या लक्षवेधी
कळंबमधील आखाड्यात मुलींच्या कुस्त्या लक्षवेधी

कळंबमधील आखाड्यात मुलींच्या कुस्त्या लक्षवेधी

sakal_logo
By

महाळुंगे पडवळ, ता. १० : कळंब (ता. आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या कुस्त्यांच्या आखाड्यात विविध भागातील १७० पहिलवानांनी भाग घेतला. पारनेर, श्रीगोंदा, नगर, पुणे, देहू, शिरूर, जुन्नर व खेड तालुक्यातील पहिलवान आखाड्यात सहभागी झाले होते. मुलींनी केलेल्या कुस्त्या लक्षवेधक ठरल्या.

भैरवनाथ मंदिराजवळ कुस्त्यांचे मैदान बनविण्यात आले होते. दुपारी साडेचार वाजता कुस्त्यांच्या आखाड्याचे उद्‍घाटन कळंब ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आले. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव भालेराव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, डी. आर. भालेराव, गंगाधर कानडे, यशवंत कानडे, शरद भालेराव, जयसिंग भालेराव, बाळशिराम वायाळ, भीमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे, सूर्यकांत थोरात, उद्योजक नितीन भालेराव, नीलेश येवले, पोलिस पाटील रवींद्र विश्वासराव, संतोष वायाळ आदी उपस्थित होते.

पारनेर, देहू व अन्य भागातील आलेल्या बारा मुलींनी लक्षवेधक कुस्त्या करून आखाड्यातील नागरिकांकडून वाहवा मिळविली. बांगडी व लांगी डाव टाकत प्रतिस्पर्धी पहिलवानांवर मात केली. २०० रुपयांपासून ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत कुस्त्या लावण्यात आल्या. पहिलवानांना एकूण एक लाख रुपये इनाम बक्षीस म्हणून वाटण्यात आला. विजयी पहिलवानांना ७० टक्के व पराभूत पहिलवानाला तीस टक्के रक्कम देण्यात आली. इनामाव्यक्तिरिक्त ग्रामस्थांनी पहिलवानांना वैयक्तिक रोख बक्षिसांची खैरात केली.
आखाड्याचे संयोजन शिवाजी भालेराव, अनिल भालेराव, अरुण भालेराव, सुनील भालेराव, बाळासाहेब भालेराव, प्रताप भालेराव, बाळशिराम भालेराव आदींनी केले. दत्ता भालेराव व गोकूळ भालेराव यांनी कुस्ती लावण्याचे काम केले. पंच म्हणून एच. पी. नरसोडे व नंदाराम भालेराव यांनी काम पाहिले. यावेळी भैरवनाथ मंदिरासाठी ग्रामस्थांनी देणग्या दिल्या.
PNE22S63266

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c62017 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top