औषधनिर्माणशास्त्र परिषदेची संशोधनासाठी अनुदानाची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

औषधनिर्माणशास्त्र परिषदेची संशोधनासाठी अनुदानाची मागणी
औषधनिर्माणशास्त्र परिषदेची संशोधनासाठी अनुदानाची मागणी

औषधनिर्माणशास्त्र परिषदेची संशोधनासाठी अनुदानाची मागणी

sakal_logo
By

भोर, ता. ११ : औषधनिर्माण (फार्मसी) विभागाच्या विद्यार्थ्यांच्या संशोधनाला चालना देण्यासाठी भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेने महाविद्यालयांना अनुदान द्यावे अशी मागणी राजगड ज्ञानपीठाच्या फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजकुमार शेटे यांनी केली. दिल्लीतील भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेचे कार्यकारी सदस्य तथा महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली.
भारतीय औषधनिर्माणशास्त्र परिषदेवर कार्यकारी सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर विजय पाटील यांनी प्रथमच भोरच्या फार्मसी महाविद्यालयास भेट दिली. त्यावेळी झालेल्या बैठकीत प्राचार्य शेटे यांनी महाविद्यालयांना येत असलेल्या अडचणींची माहिती दिली. या बैठकीस पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रसन्न पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब भिंताडे, मुळशी तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आकाश जाधव, राहुल देशपांडे, विवेक तापकीर, गणेश पवार, युनिटी मेडिकेअरचे अध्यक्ष सागर पायगुडे, डॉ. एस. कृष्णमूर्ती, डॉ. विश्वास भगत, सतीश किलजे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c62215 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top