''शाहीर रत्न''साठी धुमाळ यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''शाहीर रत्न''साठी धुमाळ यांची निवड
''शाहीर रत्न''साठी धुमाळ यांची निवड

''शाहीर रत्न''साठी धुमाळ यांची निवड

sakal_logo
By

भोर, ता. ११ : ब्राम्हणघर (ता.भोर) येथील शाहीर सुरेश धुमाळ यांची ''शाहीर रत्न'' पुरस्कारासाठी निवड झाली आहे. पुरंदर प्रतिष्ठानमार्फत हा पुरस्कार दिला जाणार असून पुरंदर किल्यावर शनिवारी (ता.१४) छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवात खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते याचे वितरण करण्यात येणार आहे.
या पुरस्कार प्रदान कार्यक्रमास कोल्हापूरच्या करवीर संस्थानचे युवराज संभाजीराजे, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, आमदार संग्राम थोपटे, माजी मंत्री विजय शिवतारे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, भोरचे उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
मूळचे गिरणी कामगार असलेले शाहीर सुरेश धुमाळ हे १९७० पासून शाहिरीमार्फत जनप्रबोधन करीत आहे. महाराष्ट्र, गुजरात, गोवा, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, कर्नाटक, पंजाब, नवी दिल्ली, नेपाल इत्यादी ठिकाणी त्यांनी आपल्या पथकाच्या माध्यमातून जनजागृती केलेली आहे. त्यांनी ४० वर्षे केलेल्या उल्लेखनीय व भरीव कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासन व अन्य संस्थांमार्फत त्यांना १५ हून अधिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


63429

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c62257 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top