‘राजगड’बाबत आज निर्णय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘राजगड’बाबत आज निर्णय?
‘राजगड’बाबत आज निर्णय?

‘राजगड’बाबत आज निर्णय?

sakal_logo
By

भोर, ता. ११ : राजगड सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद केले असून, त्या विरोधात साखर आयुक्तांच्या प्रादेशिक सहसंचालकांकडे अपील केल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. याबाबतची पहिली सुनावणी मंगळवारी (ता. १०) साखर आयुक्त कार्यालयात झाली. गुरुवारी (ता. १२) याबाबत साखर आयुक्त कार्यालयाकडून निर्णय होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
याबाबत भोर येथील राजवाड्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षकार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष घोरपडे, शहराध्यक्ष नितीन धारणे, सरचिटणीस प्रकाश तनपुरे, राजू भोसले व मनोज निगडे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार संग्राम थोपटे यांनी प्रशासनावर व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आमचे अर्ज चुकीच्या पद्धतीने बाद केले असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला.
याबाबत रणजित शिवतरे म्हणाले, ‘‘कारखान्याच्या निवडणुकीच्या उपविधीनुसार शेअर्सच्या वाढविलेल्या रक्कमेची माहिती सभासदांना दिली गेली नाही. ऊस उत्पादक गटात सलग तीन वर्षे कारखान्याला ऊस घालणाऱ्यांनाच उमेदवारीचा अधिकार आहे. परंतु, कारखान्याकडून तिसऱ्या वर्षातील काही उसाची तोड जाणूनबुजून केली नाही. त्यामुळे सभासदाला नाइलाजास्तव ७५ टक्के ऊस इतर कारखान्याला घालावा लागला. तिसऱ्या वर्षी २५ टक्के ऊस कारखान्याला दिला, तरीही आमच्या काही उमेदवारांचे अर्ज बाद केले. याशिवाय कारखान्याच्या ताळेबंदामध्ये पुणे जिल्हा बँक आणि शिखर बँकेची कर्जाची थकबाकी नसल्याचे दाखविले आहे. मात्र, जिल्हा बँकेच्या आणि शिखर बँकेच्या ताळेबंदामध्ये राजगड कारखाना थकबाकीदार आहे. त्यामुळे कारखान्याचे माजी संचालक असलेल्या ९ जणांचे उमेदवारी अर्ज बाद करावेत, अशी हरकतही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती. त्याचाही विचार केलेला नसल्याची बाब साखर आयुक्तांच्या नजरेस आणून दिली आहे.’’

हिंमत असेल तर कारखान्याच्या संचालकांनी जिल्हा बँकेचा व शिखर बँकेचा थकबाकीदार नसल्याबाबतचा दाखला सादर करावा. कारखान्याकडून उसाला योग्य भाव दिला जात नाही. सहा महिने कामगारांचा पगार थकीत केला जात आहे. अद्यापही ५०० एकरांवरील उसाचे गाळप बाकी आहे.
- रणजित शिवतरे, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c62406 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top