शिक्षकांना बदल्यांच्या आदेशाची प्रतिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांना बदल्यांच्या आदेशाची प्रतिक्षा
शिक्षकांना बदल्यांच्या आदेशाची प्रतिक्षा

शिक्षकांना बदल्यांच्या आदेशाची प्रतिक्षा

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : जिल्हा परिषद शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांसाठीच्या ॲपचे काम पूर्ण झाले आहे. त्या माध्यमातून प्राथमिक शिक्षकांच्या यंदा आॅनलाईन बदल्या केल्या जाणार आहेत. शिक्षकांच्या नवीन बदली धोरणानुसार होणाऱ्या या पहिल्याच बदल्या असणार आहेत. मात्र, त्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण, राज्य सरकारच्या बदली आदेश येईपर्यंत बदल्यांची प्रक्रिया सुरु होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
आतापर्यंत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या २७ फेब्रुवारी २०१७ रोजीच्या बदली धोरणानुसार केल्या जात असत. या बदली धोरणांत अनेक त्रुटी असल्याचा मुद्दा शिक्षकांनी उपस्थित केला होता. त्यामुळे हे धोरण बदलून नवीन धोरण अमलात आणावे, अशी मागणी राज्यातील विविध शिक्षक संघटनांनी राज्य सरकारकडे केली होती. शिवाय यासाठी उच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले होते. यानंतर ग्रामविकास विभागाने एप्रिल २०२१ मध्ये सन २०१७ चे शिक्षक बदली धोरण रद्द करून नवीन बदली धोरण निश्‍चित करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली पाच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा अभ्यासगट स्थापन केला होता. या अभ्‍यासगटाने सादर केलेल्या अहवालातील शिफारशीनुसार ग्रामविकास विभागाने गेल्यावर्षी नवीन बदली धोरण जाहीर केले. त्यानुसार शिक्षकांच्या बदल्यांसाठी खास मोबाईल ॲप विकसित करण्याचे काम सरकारने सुरु केले होते. ते आता पूर्ण झाले आहे.

घरसबसल्या मिळणार आदेश
या ॲपद्वारे केल्या जाणाऱ्या बदल्यांमध्ये काही त्रुटी राहू नयेत आणि या त्रुटीच्या आधारे बदलीनंतर उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या आव्हान याचिका टाळण्यासाठी या ॲपमधील मसुद्याची फेरतपासणी करण्यासाठी सरकारने ३४ जिल्हा परिषदांमधील मिळून १०२ जणांची तपासणी समिती स्थापन केली होती. या समितीचे कामही पूर्ण झाले आहे. शिक्षक बदल्यांसाठीचे हे ॲप मोबाईल आणि संगणक, अशा दोन्ही ठिकाणी वापरता येणार आहे. त्यामुळे राज्यातील शिक्षकांना घरबसल्या आॅनलाइन बदली आदेश मिळू शकणार आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c62565 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top