भोरमधील तरुणांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोरमधील तरुणांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण
भोरमधील तरुणांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

भोरमधील तरुणांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण

sakal_logo
By

भोर, ता. १२ : पावसाळ्यातील आपत्तींचा सामना करण्यासाठी आणि आपत्तीप्रसंगी नागरिकांना वाचविण्यासाठी भोरमधील तरुणांना दोन दिवसांचे व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी इम्रान नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदा संस्थेच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात आले.
भोरमधील सह्याद्री सर्च ऍण्ड रेस्क्यू फोर्स, भोईराज जल आपत्ती पथक, महसूल विभागाचे शिपाई, पोलिस व होमगार्ड यांना दोन दिवसांत प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले. बसरापूर येथे भाटघर धरणाच्या पाण्यात दोन बोटींव्दारे हे प्रशिक्षण देण्यात आले. पाण्यात बोट जोडणे, बोट चालवणे, चालू बोट मध्ये अपघातात बचाव कार्य करणे, बुडालेल्या व्यक्तीचे शोधकार्य आणि साहित्याचा उपयोग याबाबत माहिती दिली. मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून प्रमोद बलकवडे व इम्रान नायकवडी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत हे प्रशिक्षण दिले. यावेळी तहसीलदार सचिन पाटील व भोरचे पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे उपस्थित होते. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी या प्रशिक्षणाचा आढावा घेतला.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c62574 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top