मुलीवर अत्याचार केल्याने नांदघूरच्या तरुणास अटक मुलीवर अत्याचार केल्याने नांदघूरच्या तरुणास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीवर अत्याचार केल्याने नांदघूरच्या तरुणास अटक
मुलीवर अत्याचार केल्याने नांदघूरच्या तरुणास अटक
मुलीवर अत्याचार केल्याने नांदघूरच्या तरुणास अटक मुलीवर अत्याचार केल्याने नांदघूरच्या तरुणास अटक

मुलीवर अत्याचार केल्याने नांदघूरच्या तरुणास अटक मुलीवर अत्याचार केल्याने नांदघूरच्या तरुणास अटक

sakal_logo
By

भोर, ता. १२ : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी नांदघूर (ता.भोर) येथील तरुणास भोर पोलिसांनी अटक केली. प्रकाश भगवान मांढरे (वय. २२) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून ही घटना फेब्रुवारी व एप्रिल महिन्यात घडली. आरोपी प्रकाश याने शेजारच्या १६ वर्षीय मुलीस अत्याचार केला. आरोपी व संबंधित मुलगी गप्पागोष्टी करीत आढळल्यामुळे मुलीच्या आई-वडिलांनी मागील आठवड्यात बुधवारी (ता.४) भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मात्र मुलीने आई-वडील मारहाण करीत असल्याचे सांगत त्यांच्याकडे राहण्यास नकार दिला. पोलिसांनी बालकल्याण समितीच्या निर्णयानुसार तिला सुधारगृहात ठेवली. त्यानंतर पोलिसांनी पुढाकार घेऊन तिची मेडिकल तपासणी केली असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे लक्षात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भोर पोलिसांनी तब्बल आठ दिवसानंतर बुधवारी (ता.११) रात्री प्रकाश मांढरे याच्यावर बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c62931 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top