संचालकांवर केलेले आरोप हे व्यक्ती द्वेशातून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संचालकांवर केलेले आरोप हे व्यक्ती द्वेशातून
संचालकांवर केलेले आरोप हे व्यक्ती द्वेशातून

संचालकांवर केलेले आरोप हे व्यक्ती द्वेशातून

sakal_logo
By

भोर, ता. १३ ः अनंतनगर- निगडे (ता. भोर) येथील राजगड कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांकडून सत्ताधारी कॉंग्रेस पक्षाच्या संचालकांवर केलेले आरोप हे व्यक्ती द्वेश भावनेतून केल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम थोपटे यांनी केले. आमदार संग्राम थोपटे यांनी गुरुवारी (ता. १२) सायंकाळी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडण केले. निवडणुकीच्या कार्यपद्धतीची व कारखान्याच्या उपविधींची माहिती नसल्याबद्दल विरोधकांची खिल्ली उडवली.
यावेळी काँग्रेसच्या पॅनेलचे उमेदवार के. डी. सोनवणे, दिनकरराव धरपाळे, विकास कोंडे, शिवाजीराव कोंडे, पोपट सुके, सुभाष कोंढाळकर, सुरेखा निगडे आदींसह विठ्ठल आवाळे, रोहन बाठे, विठ्ठल कुडले, दत्तात्रेय चव्हाण व संतोष सोंडकर उपस्थित होते. आमदार थोपटे म्हणाले, ‘‘कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने महाविकास आघाडीचा धर्म सोडून भाजपसोबत युती केली. निवडणुकीत त्यांना पुरेसे उमेदवारही मिळाले नाहीत आणि त्यांच्या उमेदवारांचे अर्ज छाननीत बाद झाले. त्याबाबत त्यांनी साखर आयुक्तांकडे केलेल्या अपिलात गुरुवारी (ता. १२) आम्ही आमची बाजू मांडली. साखर आयुक्तांकडून त्याबाबतचा निकाल १७ मे रोजी मिळेल. आणि १८ मे रोजी अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे. साखर आयुक्तांकडील अपिलांचा निर्णय काहीही लागला तरीही सभासद विरोधकांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त करून त्यांना योग्य जागा दाखवतील.’’

सभासदांच्या हितासाठी
संचालक मंडळ खंबीर
काही विरोधकांनी ऊस पिकविलेला नाही आणि काही कारखान्याचे सभासदच नाहीत. तरीही ते शेतकरी व ऊस उत्पादकांप्रती खोटा कळवळा आणत आहेत. स्वतः निवडणुकीत न उतरता सर्वसामान्यांना निवडणुकीसाठी उभे करून त्यांचे प्रपंच उद्‍ध्वस्त करण्याचे काम करीत आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी हे त्यांचे काम कोणत्याही दबावाखाली नाही तर लोकशाही पद्धतीने करीत आहेत. राजगड कारखाना जिल्हा बँकेचा थकबाकीदार असल्याचे कोणतेही पुरावे त्यांनी छाननीच्या वेळी दिले नाहीत. ३३ वर्ष आम्ही राजगड कारखाना चालवीत सहकार जोपासला आहे. विरोधकांकडे शेतकरी व कामगार याबाबतची दूरदृष्टी नाही, त्यामुळे त्यांनी सहकार शिकविण्याचा शहाणपणा करू नये. सभासदांचे हीत जोपासण्यासाठी कारखान्याचे संचालक मंडळ खंबीर आहे. त्यामुळे विरोधकांनी सभासदांच्या हिताचा खोटा पुळका आणू नये, असे आमदार थोपटे यांनी सांगितले.


कारखान्याकडून कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप झाल्याशिवाय कारखाना बंद केला जाणार नाही. आज अखेर कार्यक्षेत्रातील २ लाख टन उसापैकी केवळ १५ हजार टन उसाचे गाळप बाकी आहे. ऊसतोड जलद व्हावी, यासाठी चार मशिन्स सुरु आहेत.
-संग्राम थोपटे, आमदार

63874

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c62946 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top