वळती येथे तुकाई भैरवनाथ पॅनेलची बाजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वळती येथे तुकाई भैरवनाथ पॅनेलची बाजी
वळती येथे तुकाई भैरवनाथ पॅनेलची बाजी

वळती येथे तुकाई भैरवनाथ पॅनेलची बाजी

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. १३ : वळती (ता. हवेली) येथील वळती विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पॅनेल प्रमुख बाळासाहेब कुंजीर यांचा अवघ्या २ मतांनी पराभव झाला. विरोधी ग्रामदैवत तुकाई भैरवनाथ जनसेवा पॅनेलचे प्रमुख काका कुंजीर हे विजयी झाले असून त्यांच्या पॅनेलने बाजी मारली. निवडणूक अधिकारी विजयसिंह माळवदकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडली.
बाळासाहेब कुंजीर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामदैवत शेतकरी विकास पॅनेल व शिवसेनेचे नेते संजय ऊर्फ काका कुंजीर यांच्या नेतृत्वाखाली ग्रामदैवत तुकाई भैरवनाथ जनसेवा सहकारी पॅनेल यांच्यात १२ जागांसाठी ही लढत झाली. बाळासाहेब कुंजीर यांच्या गटाने जवळजवळ २७ वर्ष सत्ता राखली होती. परंतु, यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी सत्तांतर घडून आणले.
सोसायटीचे नवनिर्वाचित संचालक मंडळ : अर्जुन दादासाहेब कुंजीर, पांडुरंग नामदेव कुंजीर, संजय महादेव कुंजीर, नंदू नामदेव घोलप, कुंडलिक मारुती कुंजीर, बापू काशिनाथ कुंजीर, मंगेश काळुराम कुंजीर, गोरख दत्तात्रेय कुंजीर, मल्हारी ठोंबरे, मारुती कोंडिबा कदम, शारदा भगवान कुंजीर, स्नेहल किरण कुंजीर.
63981

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c63102 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top