उरुळीच्या मदने दांपत्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उरुळीच्या मदने दांपत्याची 
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
उरुळीच्या मदने दांपत्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

उरुळीच्या मदने दांपत्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

sakal_logo
By

उरुळी कांचन, ता. १३ : उरुळी कांचन येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने व राष्ट्रीय खेळाडू मनिषा मदने या दांपत्याची केरळ (तिरुअनंतपुरम) येथे होणाऱ्या चौथी राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. १८ ते २२ मे दरम्यान ही स्पर्धा होणार आहे.
चौथ्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्स स्पर्धेत दोघेही ४०० मीटर धावणे हर्डल्स, १०० मीटर धावणे हर्डल्स, ४०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात भाग घेणार आहेत. तर मनिषा मदने या गोळा फेक, थाळीफेक या क्रीडा प्रकारातही भाग घेणार आहेत.
आंतरराष्ट्रीय खेळाडू धनंजय मदने हे सध्या महाराष्ट्र मास्टर्स गेम्स असोसिएशन या संस्थेच्या सहसचिव या पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांना अण्णा भाऊ साठे क्रीडारत्न पुरस्कार तसेच अव्दैत चषक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
63984

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c63104 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top