वाल्हेत दुग्धाभिषेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाल्हेत दुग्धाभिषेक
वाल्हेत दुग्धाभिषेक

वाल्हेत दुग्धाभिषेक

sakal_logo
By

वाल्हे : छत्रपती संभाजी महाराज हे कोणत्याही एका जातीच्या विरोधात लढले नाहीत. स्वराज्य मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न होते. त्यामुळे त्यांचे गुण तरूणांनी आत्मसात करावेत, असे मत वाल्हेचे सरपंच अमोल खवले यांनी व्यक्त केले.
वाल्हे (ता. पुरंदर) येथील मुख्य बाजारपेठेतील गांधी चौकामध्ये महाराज ग्रुपच्या वतीने आज शनिवारी (ता. १४) छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. याप्रसंगी महाराज ग्रुपच्या शिवभक्तांनी पुरंदर किल्ल्यावरून शिवज्योत आणली. या वेळी सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यावेळी खवले बोलत होते. याप्रसंगी माजी सरपंच महादेव चव्हाण, सूर्यकांत पवार, सत्यवान सूर्यवंशी, गोरख कदम, रामदास राऊत, त्रिंबक भुजबळ, सूर्यकांत भुजबळ, सतीश पवार, संतोष पवार, विनोद पवार उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर व छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करत महाराजांचा जयजयकार करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला सकाळी प्रतीक पवार व जान्हवी पवार या नवदाम्पत्यांच्या हस्ते दुग्धाभिषेक करण्यात आला. तदनंतर प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. या वेळी सचिन आगलावे यांनी पौराहित्य केले. याप्रसंगी महाराज ग्रुपचे अध्यक्ष अतुल पवार, शंतनू नवले, ऋत्विक पवार, दत्तात्रेय पवार, समीर रोकडे, अक्षय पवार, सूरज पवार आदींनी संयोजन केले.
आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथे अमर तरुण मंडळाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली. यावेळी मंडळाच्या तरूणांनी किल्ले पुरंदरवरुन शिवज्योत आणली. शिवज्योतीचे वाल्हेसह आडाचीवाडी गावांतर्गत गुलालाची मुक्त उधळण करीत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. याप्रसंगी सरपंच दत्तात्रेय पवार, अथर्व पवार, सागर पवार, हितेश पवार, काका पवार, पोपट पवार आदि उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Pne22c63448 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top