Sat, March 25, 2023

उरुळीतील शिबिरात
१०० जणांचे रक्तदान
उरुळीतील शिबिरात १०० जणांचे रक्तदान
Published on : 19 May 2022, 12:47 pm
उरुळी कांचन, ता. १९ : छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त उरुळी कांचन (ता. हवेली) येथे मृत्युंजय प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात शंभर जणांनी रक्तदान केले. प्रादेशिक रक्त केंद्र ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या वतीने राष्ट्रीय स्वेच्छा चळवळ या योजनेअंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी उरुळी कांचन पोलिस चौकीचे पोलिस उपनिरीक्षक किरण धायगुडे, डॉ. समीर कुंडलिक ननावरे, बाळासाहेब पांढरे, मृत्युंजय प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश कांचन, उरुळी कांचनचे सरंपच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, सुनील तांबे, युवानेते अंजिक्य कांचन, माजी उपसरपंच युवराज कांचन, शिवाजी ननवरे आदी उपस्थित होते. यावेळी शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान झाले.